दौरे नको पाहणी नको थेट तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करा.:-निलेश देशमुख जिल्हाप्रमुख विद्यार्थी सेना बुलढाणा

 

बुलडाणा जिल्ह्यात खास करून घाटाखालील भागात मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. नागरी वस्त्यांचे देखील नुकसान झाले आहे. लाखो हेक्टर वरील पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे.

त्यामुळे अतिवृष्टीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदतीसाठी पावले उचलण्यात यावीत, जिल्ह्यातील पालकमंत्री कुठे आहे यांना लाज वाटायला पाहिजे दौरे करण्यात पेक्षा मदत जाहीर करा

जळगाव जामोद व संग्रामपुर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्याना पुर आल्यामुळे गावातिल गुरे ढोरे , शेतातिल उभे पराटी, सोयाबिन, तुर पिके वाहून जमीनी खरडुन गेली घरे वाहुन गेल्या मुळे लोक बेघर झाली आहे दौरे न करता तात्काळ सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी उ.बा.ठाकरे शिवसेना.विद्यार्थी जिल्हाप्रमुख निलेश देशमुख यांनी केली व शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील

Leave a Comment