Home बुलढाणा धार्मिक स्थळ उघडा सस्थान प्रमुखांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

धार्मिक स्थळ उघडा सस्थान प्रमुखांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

414
0

 

आयुषी दुबे शेगाव

शेगाव गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेले शेगाव तालुक्यातील धार्मिक स्थळ सुरू करण्याची मागणी धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे याबाबत धर्मजागरण समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शेगाव तहसीलदार यांच्या माध्यमातून पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले मंदिरे देवस्थान बंद आहेत वास्तविक मंदिरे देवस्थाने ही मानसिक शांती व प्रेरणा देणाऱ्या असतात राज्य शासनाने धार्मिक स्थळे मंदिरे देवस्थाने सोडून इतर सर्वांना कोविड – १९ ची नियमावली लावून आपापली दुकाने प्रतिष्ठाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे त्याच प्रमाणे नियमावली लावून राज्यभरातील मंदिरे देवस्थाने हिंदूंचे धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर श्री संत गोमाजी महाराज संस्थान नागझरी अध्यक्ष धनंजय पाटील ह भ प बाबुरावजी लंके महाराज गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुशील महाराज वनवे शेखर भाऊ नागपाल यांच्यासह शेगाव तालुक्यातील व शहरातील विविध धार्मिक थऴे व मंदिरांचे व संस्थांचे प्रमुख आणि भाविक भक्तांच्या सह्या आहेत.

Previous articleगौताळा व्हॅली इंग्लिश स्कूल कन्नड या शाळेची मूळ मान्यता तत्काळ रद्द करावी कृष्णा गाडेकर यांची मागणी
Next articleनदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता बंद झाल्याने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here