धुक्याची चादर ओढून उगवली पहाट !

 

▪ दाट धूक्याची सुखद अनुभूती

बुलडाणा : गुलाबी थंडी आणि दाट धुके… असे मनमोहक वातावरण बुलडाणेकरांनी आज गुरुवारी अनुभवले. पहाट उगवली ती धुक्याची दाट चादर पांघरुनच ! सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहररात धुक्यामुळे सूर्यदर्शन झाले नव्हते.

गेल्या काही दिवसांपासून शहरासह परिसरात थंडीची तीव्रता वाढत आहे. १७ डिसेंबरला तर नगरकरांनी गुलाबी थंडीसोबतच दाट धुके व दवबिंदू अशा मनमोहक वातावरणाचा अनुभव घेतला.धुक्यामुळे शहरातील रस्तेसुद्धा दिसत नव्हते. वाहनचालकांना रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने प्रमूख मार्गांवरील वाहतूक संथगतीने सुरू होती. या अल्हाददायी वातावरणामूळे निसर्ग आणखीच फुलला होता.

Leave a Comment