नऊ वर्षीय चिमुकल्याला सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याची धक्कादायक घटना

 

सुनील पवार नांदुरा

बुलढाणा : नऊ वर्षीय चिमुकल्याला सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याची धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथे समोर आली आहे. आर्यन सचिन शिंगोटे असे चिमुकल्याचे नाव आहे त्याला उपचारासाठी अकोला हलवण्यात आले आहे.

आर्यन सचिन शिंगोटे याच्या आईने आत्महत्या केल्याने मुलांचा सांभाळ करण्यासाठी सचिन शिंगोटे ह्याने दुसरे लग्न केले होते.पंरतु मुलांचा सांभाळ करण्याऐवजी सावत्र मुलाचा छळ करण्यात येत होता. चार दिवसांपूर्वी आर्यनची सावत्र आई शारदा हिने आर्यनचे हातपाय पकडून त्याला गरम तव्यावर उभे देऊन चटके दिले. त्याने आरडाओरड करू नये म्हणून त्यांचे तोंडही दाबून ठेवण्यात आले होते. तीन दिवसांपासून आर्यन घराच्या बाहेर येत नाही असे दिसल्याने शेजाऱ्यांनी घरात जाऊन बघितल्यावर हा धक्कादायक प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आला.

शेजारच्यांनी त्याला त्वरित खामगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकुती चिंताजनक असल्याने त्याला अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आर्यनचे वडील सचिन शिंगोटे हा प्रकार डोळ्याने बघत असूनही त्याने मध्यस्थी केली नाही. याप्रकरणी बोरोखेडी पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील करवाईसाठी पोलिस पथक अकोला येथे गेले आहे.

Leave a Comment