नगरपरिषद हदितील बिना परवानगी/ अनाधिकृत बॅनर, बोर्ड, झेंडे, पताके लावण्यावर होणार कारवाई

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट नगर परिषद हहितील बिना परवानगी / अनाधिकृत बॅनर, बोर्ड, झेंडे, पताके लावित
असल्याचे नगर परिषदेच्या निर्देशनास आले आहे. त्यामुळे या नंतर नगर परिषदतर्फे सर्व नागरीक / राजकिय पक्ष यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, या नंतर शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी बॅनर, बोर्ड, झेडे, पताके लावायची असल्यास मिळकत विभाग, नगर परिषद, हिंगणघाट यांचे कडून नियमानुसार परवानगी घेवूनच लावावे. बिना परवानगी शहरामध्ये बॅनर, बोर्ड, झेडे, पताकेछापणाऱ्या दुकानदारांनी सुध्दा बॅनर, बोर्ड, झंडे, पत्ताके छापण्यापूर्वी किंवा शहरामध्ये लावण्यापूर्वी त्यांनी नगर परिषदेची रितसर परवानगी घेतली किंवा नाही याची माहिती घेवून शहरामध्ये बॅनर, बोर्ड, झंडे, पताके लावावे. PIL १५५ अंतर्गत मा. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हा दाखल करून दंड वसूल करण्यात येईल. व संबंधीत छपाई करणारे दुकान मालाकाचे परवाने सुध्दा रह करण्याची कारवाई या कार्यालयाकडून करण्यात येईल असे आवाहन श्री. हर्षल गायकवाड, मुख्याधिकारी (निवड श्रेणी), नगर परिषद, हिंगणघाट, श्री. निलेश शिंदे, प्रशासकिय अधिकारी, नगर परिषद, हिंगणघाट व मिळकत विभाग श्री. वसंता रामटेके, श्री. राजु डुकरे, श्री. नंदकिशोर लांडगे यांचे द्वारे करण्यात येत आहे.

Leave a Comment