नगर पालिका प्रशासन कडून प्लास्टिक बंदी विरोधात धडक कार्यवाही.

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- राज्य अभियान संचालक,महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, महाराष्ट्र नागरी विकास संचनालय स्वच्छता अभियान (नागरी) मुंबई व विभागीय अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ,नागपूर यांचे दिनांक १४/१०/२०२२ चे प्राप्त आदेशानुसार दिनांक १७/१०/२०२२ ते २०/१०/२०२२ या कालावधी मध्ये हिंगणघाट शहरात प्रभावी प्लास्टिक बंदी अभियान राबविणे बाबत आदेश प्राप्त झाले होते त्या अनुशंघाने हिंगणघाट नगर पालिका प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ तसेच पोलीस प्रशासन यांचे सयुंक्तिक पथकाद्वारे द्वारे प्लास्टिक बंदी विरोधात दिनांक १७/१०/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजे पासून शहरातील आस्थापना तसेच लहान व मोठी दुकाने यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये स्थानिक विठोबा चौक येथील श्रीचंद कलेक्शन ,हिंगणघाट यांचे कडील साठवणूक केलेले प्लास्टिक ओवन पिशवी जप्त करण्यात आले तसेच आठवडी बाजार स्थित तूळजाई पूजा घर यांचे दुकानातून अंदाजे १ किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आले ,आठवडी बाजार येथील झुलेलाल माल यांच्या दुकानातून अंदाजे १ किलो प्लास्टिक चम्मच जप्त करण्यात आले. सर्व दुकानदार यांना प्रथम वेळ असल्यामुळे प्रत्येकी ५,०००/- दंड आकारण्यात आला. शहरातील इतर लहान व मोठ्या आस्थापनांची प्लास्टिक बंदी पथकाने तपासणी केली व सर्वाना प्लास्टिक पिशवी तसेच इतर बंदी घालण्यात आलेले साहित्य न वापरण्या बाबत सूचना देण्यात आल्या. सदर कार्यवाही नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. हर्षल गायकवाड यांचे आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी श्री. महेश भिवापूरकर यांच्या मार्गदर्शन खाली प्लास्टिक बंदी पथकाचे नियंत्रण अधिकारी श्री.विशाल ब्राम्हणकर,स्वास्थ निरीक्षक श्री.विजय खोब्रागडे, श्री.अविनाश चव्हाण,शहर समन्वयक श्री.अक्षय इंगळे. पथक प्रमुख श्री.वसंत रामटेके, पथकातील कर्मचारी श्री.मदन मशानकर,श्री.रऊफ खान, श्री.वल्लभ जोशी,श्री.राज खरे, श्री.सागर बैस तसेच पोलीस प्रशासनातील पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री.राजकुमार कुवर यांनी केली. नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री.हर्षल गायकवाड यांनी शहरातील नागरिकांना तसेच व्यापारी वर्गाना प्लास्टिक चा वापर न करणेबाबत आवाहन केले असून शहरातील आस्थापनांची नियमितपणे प्लास्टिक बंदी पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी प्लास्टिक बंदी मोहिमेस सहकार्य करणेबाबत आवाहन केले आहे.

Leave a Comment