नवनियुक्त ग्रामसेवक अर्जुन गवई व सरपंच सौ अर्चना विनोद खरात यांनी शिंदी येथे मार्गी लावले विविध विकास कामे !

 

सिंदखेडराजा l ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे नवनियुक्त ग्रामसेवक व धडाडीचे निर्णय घेण्यात माहीर असलेले ग्रामसेवक श्री अर्जुन गवई वसरपंच सौ अर्चना विनोद खरात यांनी अल्पावधीतच शिंदी या गावी विविध विकास कामे मार्गी लावलेली आहे तर काही विकास काम अजूनही सुरू आहे ‘यामध्ये जिल्हा उच्च माध्यमिक शाळेतील सुशोभिकरण स्वच्छालय व गेट ‘अंगणवाडी ला निधी ‘गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मध्ये सुशोभीकरण ‘अगोदर मिळणारे 17 दिवसांनी पिण्याचे पाणी आता चार दिवसांनी मिळते ।तसेच गावातील सांडपाणी जाण्यासाठी नाल्या नव्हत्या अनेक ठिकाणी गटारे साचून लोक आजारी पडले होते .अशा ठिकाणी उतार काढून त्यामध्ये पाईप टाकून सांडपाणी जाण्यासाठी नाल्याचे काम प्रगतिपथावर आहे !सांगायचे तात्पर्य एवढेच की सरपंच व सचिव यांनी समन्वय साधून गावच्या विकासासाठी चांगले काम सध्या करीत आहेत याचं समाधान लोकांना मिळत आहे !

Leave a Comment