नवनियुक्त मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांची हिंगणघाट काँग्रेस तर्फे सदिच्छा भेट..

 

हिंगणघाट नगरपालिका येथे नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांची सदिच्छा भेट हिंगणघाट काँग्रेस पार्टी तर्फे घेण्यात आली यात शहरातील खूप विषयावर सविस्तरपणे चर्चा सुद्धा झाली त्यामध्ये वना नदीच्या पुरामुळे झालेल्या घाणीची साफसफाई असो किंवा पावसामुळे शहरात जिकडे तिकडे गवत, झाडे झुडपी खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून येथील उपजिल्हा रुग्णालयात सुद्धा खूप प्रमाणात झाडे गवत वाढले त्यावर ही उपाय करण्यात यावा शहरांमध्ये सगळीकडे रोगराई प्रतिबंधक फवारणी व साफसफाई करण्यात यावी शहरांमध्ये चौका चौकात मुके जनावराचा जमावळा असो अशा प्रकारच्या विविध समस्यावर तोडगा काढण्यासाठी माजी राज्यमंत्री अशोक भाऊ शिंदे व हिंगणघाट काँग्रेस कमिटी, अध्यक्ष, पंढरी भाऊ कापसे व त्यांचे सहकारी गुणवंत कारवटकर, सुरेश गायकवाड, पुरुषोत्तम मून, अखिल धाबरडे, मिराज भाई, ज्वलंत मून व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Comment