नवोदय विद्यालय घोटचे प्राचार्य राजन गजभिये यांना महाराष्ट्र गौरव सन्मान.चाणक्य शैक्षणिक संस्था नागपूरच्या वतीने सन्मानित.

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:- गडचिरोली सारख्या दुर्गम,आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालय घोट येथे सातत्याने शैक्षणिक गुणवत्तेचे मानांकन प्राप्त करून देणारे कर्तव्यदक्ष प्राचार्य राजन गजभिये यांना चाणक्य बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने “महाराष्ट्र गौरव पुरस्कार-२०२३” देऊन नागपूर येथे आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

राजन गजभिये यांना पुरस्कार प्रदान झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन केल्या जात आहे.दरम्यान आयोजक अविनाश लंगोटे व संस्थेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Comment