नागपूर : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मेट्रोचे संचालन पूर्व पदावर आले असून लॉकडाऊनच्या काळात महा मेट्रोने कार्याचा वेग कायम ठेवत स्टेशन निर्माण कार्य पूर्ण केले.ज्यामध्ये रहाटे कॉलोनी, अजनी चौक, बंसी नगर,एलएडी चौक, शंकर नगर आणि रचना रिंग रोड जंकशन मेट्रो स्टेशन अनलॉक झाले व या स्टेशन मधून प्रवासी सेवा सुरु झाली आहे व नागरिकांना या मेट्रो स्टेशनचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. इथेच न थांबता जास्तीत जास्ती नागरिकांनी मेट्रो व सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करावा याकरिता घोड दौड सुरु आहे याच पार्श्वभूमीवर काल दिनांक 20 डिसेंबर 2020 रोजी महा मेट्रोच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवर तब्ब्ल 17562 नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला.
महा मेट्रो तर्फे प्रवाश्यान करिता विविध सोई सुविधा मल्टी मॉडेल इंट्रिग्रेशन अंतर्गत उपलब्ध करण्यात येत असून मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा महा मेट्रोने सुरु केली असून नागरिकांना याची पसंती मिळत आहे. तसेच शहरातील प्रतिष्टीत व्यक्ती, अधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिक मेट्रोने प्रवास करून नागरिकांनी जास्तीत जास्ती मेट्रोचा उपयोग करावा या करिता नागरिकांना प्रेरित करीत आहेत तसेच महा मेट्रोने शहरातील व स्टेशन परिसरातील प्रतिष्टीत व्यक्तीना महा मेट्रोच्या स्टेशनचे अॅेम्बेसेडर म्हणून महा मेट्रोशी जोडले आहे.
काल वाढलेली रायडरशीप संख्या ही कोविड नंतर सुरू झालेल्या मेट्रो सेवेमधील सर्वात जास्त होती व कोविडच्या पूर्वीच्या तुलनेत सर्वात जास्त होती.
कोविड पूर्वी (रविवार रायडरशीप)
26-01-2020 :- 21258,
09-02-2020 :- 17968,
02-02-2020 :- 17749,
16-02-2020 :- 16579,
23-02-2020 :- 13726.
कोविड नंतर (रविवार रायडरशीप)
20/12/2020:- 17562,
13/12/2020:- 15404,
06/12/2020:- 13187,
29/11/2020:- 11488.
नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची रायडरशीप मध्ये झालेली वृद्धी ही जयपूर,नोएडा व अहमदाबाद मेट्रो रेल प्रकल्पाच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. तसेच महा कार्ड धारक, सायकल सोबत नेत मेट्रोचा प्रवास करणारे प्रवासी संख्ये मध्ये देखील वाढ होत आहे तसेच नियमित प्रवास करणारे नागरिक यांचा देखील समावेश आहे. याव्यतिरिक्त शनिवार व रविवार वगळता दररोज प्रवास करणारे नागरिक सरासरी प्रतिदिन 10 हजार पेक्षा जास्ती आहे.