नावरे येथील रीना सुनील मेंढे या महिलेचा शेत काम करीत असतांना अंगावर वीज पडून जागीच मृत्यू

 

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल तालुका नावरे. येथील रीना सुनील मेंढे या ३९ वर्षीय महिलेचा विरावली शिवारात शेत काम करीत असतांना अंगावर वीज पडून जागीच मृत्यू

विषयी अधिक वृत असे की, आज गुरुवार दिनांक 23 जून रोजी येथील रिना सुनील मेढे या ३९.वर्षे महिला विरावली शिवारात शेती काम करीत होत्या दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पाऊस सुरू असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली त्यांना यावल.च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असताना यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बी. बी.बारेला यांनी त्यास मृत घोषित केले.

यासंदर्भात उत्तम भोजु मेढे यांनी दिलेल्या खबरी वरून यावल पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयत महिला यांनी एक १८आणि एक १६ वर्षाचा मुलगा असून ६ महिन्यांपूर्वी सुनिल भोजू मेढे हे यांचा देखील अपघाती मृत्यू झाला होता .वडील आणि आई दोघही जग सोडून गेल्यामुळे त्यांच्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे

Leave a Comment