आजचे सामाजिक राजकीय वातावरण बघता व्यवसाय घर सांभाळून काम करण्याची गरज आहे असा विचार रुजवून आदर्श ठेवणारे वेक्तीमहत्व
सर्वसामान्य कुटुंबातील जीवनमान जागून काहीतरी सर्वांपेक्षा वेगळं करावं आपल स्वतःच अस्तित्व असावं आपण इतरांपेक्षा वेगळं काही तरी करावं आणि आपण नेतृत्व करून कर्तुत्व सिद्ध करावं हा विचार ज्याच्या मनात लहानपणी येतो आणि मग जेव्हा शाळेत आपण शिक्षणाचे धडे घेतो.
त्या सोबतच सामाजिक आणि सर्वांगीण विकासाची संकल्पना मनात ठेऊन हे कर्तुत्व शिद्द करण्यासाठी तो काम करण्यासाठी पाऊल टाकतो तेव्हा आज तो कर्तुत्वाच्या जोरावर आज चालत चालत यशाच्या मार्गाने प्रस्थान करत असतो ,
वयाच्या पंधराव्या वर्षी ज्याने समाजकारण काय असते ह्याचे धडे घेत श्री गुरुदेव सेवा आश्रमाच्या माध्यमातून सर्वांगीण सुसंस्कार वर्गात जाऊन प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि तुकडोजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करत असताना शिक्षणासोबतच आपले ध्येय आणि मतील विचार हे डोळ्यासमोर ठेऊन महाविद्यालयीन शिक्षण आणि सोबत व्यवसाय करत आज एका विशिष्ट वळणावर जेव्हा हा युवक येऊन पोहचतो तेव्हा मात्र त्याच्या बद्दल लिहावं लागत बोलाव लागत हे नक्की, राजकीय वारसा नाही ,
पण वडिलांचे सामाजिक कार्य करण्याचे मिळालेले धडे मनात घेऊन आज अवघ्या 15 वर्षा आधी नवीन गावात वास्तव्याला आल्या नंतर आज संपूर्ण गावात आपल्या कार्याने ज्याची ओळख निर्माण होते , त्या युवका बद्दल लिहावं लागत ,
विठ्ठल शेषराव अवताडे , हे मूळचे दहिगाव अवताडे चे ,त्यानंतर जन्मा आधीपासून त्यांचा परिवार कोद्रि येथे राहत होता पण पंधरा वर्षा आधी शेगाव येथे ते स्थाईक झाले आणि आज आपल्या कर्तुत्वाने आणि स्वभावाने सर्वांच्या मनात बसले ,
विठ्ठल अवताडे यांचं सुरुवाती पासून शिव शाहू फुले आंबेडकर विचारावर काम करण्याचं माणसं आणि ह्याच माध्यमातून त्यानी २०१३ मध्ये संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ,आपले विचार मांडणे , वेळोवेळी आंदोलन करणे , न्याय, हक्क , शेतकरी , विद्यार्थी ,सर्वसामान्य जनतेचा मुद्दा घेऊन काम करायला सुरुवात केली. आज पर्यंत त्यांनी आज शेकडो आंदोलन केले शेकडो असतील त्याच सोबत आज मराठा पाटील युवक समिती चे माध्यमातून समाज एकत्रीकरण करण्याच्या दृष्टीने समाजातील विविध विषयांवर काम ते करत आहेत ,
त्या सोबतच सर्वसामान्यांचा आवाज बुलंद व्हावा म्हणून पत्रकारिता त्यांनी स्वीकारून आज आपल्या पत्रकारितेचे माध्यमातून ते काम करत आहेत ,
विठ्ठल अवताडे हे चांगले वक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत याची नोंद घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी चे माध्यमातून त्यांना राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जन नायक पुरस्कार २०२० प्राप्त झालेला आहे, त्याच बरोबर विविध सामाजिक संघटनात्मक बांधणी मध्ये ते सक्रिय असतात ,ह्या सगळ्याच्या सोबतच स्वतः त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षणं घेत असताना इतर डिप्लोमा आणि व्यवसाय सुद्धा सांभाळा आहे ,आज त्यांचा स्वतःच्या मालकीचा केबल आणि इंटरनेट व्यवसाय आहे ,
टॅक्सी सर्व्हिस आहे , सोबतच त्यांचे सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांसोबत असणारे समंध आणि त्यांचे कार्य बघता कर्तुवाबद्दल नक्कीच आदर्श आहे , आज गेल्या पंधरा वर्षांच्या ह्याच सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन आज ते प्रत्यक्ष राजकीय वाटचाल करत आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणून भविष्यात भाऊ आपल्या हातून असेच कार्य घडत राहो आणि आपण यशाच्या उंच शिकरावर जावं आणि नक्कीच आपल कर्तुत्व सिद्ध होऊन यश संपादित करावं हीच प्रार्थना , आज आपण जी प्रत्यक्ष राजकीय वाटचाल करत आहात त्यात
तुम्हाला यश मिळो आणि गेल्या पंधरा वर्षांत आपण निस्वार्थ केलेल्या समाज कार्याच्या अनुभवातून आज आपण विचार करत असलेल्या आपल्या मनातील राजकीय इछा पूर्ण होऊन आपण नक्कीच एकदा राजकीय कर्तुत्व सिद्ध करावं आणि आपल्या हातून आजन्म समाज कार्य घडत राहावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना
राह में खतरे बहुत है मगर ठहरता कोण है
मौत कल नाही तो आज आयेगी डरता कोण है
तेरे लष्कर के मुताबिक अकेला हू मै
लेकीन फैसला मैदान मे होगा बाजी मारता कोण है
नक्कीच आपण ही बाजी मारावी आणि यशस्वी व्हावं ह्या आमच्या मनापासून वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा आहेत
श्याम अढाव पाटील
मराठा पाटील युवक समिती तालुका अध्यक्ष शेगाव