_जळगांव :- आज दि .२८/०५/२०२३ रविवार रोजी जळगाव येथील पदमालय गेस्ट हाऊस येथे संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष प्रमुख आनंदभाऊ बाविस्कर यांच्या उपस्थिती तसेच जिल्हा अध्यक्ष सतिषजी वाडे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव युवक ज़िल्हा अध्यक्ष पदी अनुपकुमार मनुरे व महिला मंच जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी प्रतिभाताई भालेराव यांची निवड करण्यात आली ._
_त्याप्रसंगी संघटनेच्या ध्येयधोरणा विषयी माहिती देऊन सुचना देण्यात आल्या पाचोरा , चोपडा , यावल , रावेर या तालुक्यातील अनेक महिला व पुरुषांनी संघटनेत प्रवेश केला .
त्याप्रसंगी जळगाव जिल्हा कार्यध्यक्ष सदाशिव निकम , जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे , यावल तालुका युवक अध्यक्ष सतिष अडकमोल , यावल तालुका महिला मंच अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे , रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय धनगर , पाचोरा तालुका अध्यक्ष भैय्या बागवान , भुसावळ तालुका महिला मंच अध्यक्षा साधनाताई वाघ , जळगाव महानगर महिला मंच अध्यक्षा गिताताई वाघ ,
युवा सेना यावल तालुका अध्यक्ष तसलिम तडवी ,पिंकीताई सुतार , इंदिराताई भिलाला , अनिताताई बाविस्कर , अनिल वाघ , इकबाल तडवी , अनिल इंधाटे , जंहागिर तडवी , चंद्रकांत सोनवणे , कुंदन तायडे यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ._