निसर्गसाथी फाऊंडेशन चे करण विटाळे यांनी अजगर जातीच्या सापाला विहिरीच्या बाहेर काढून दिले जिवदान.

 

 

हिंगणघाट : तालुक्यातील मौजा कान्हापूर येथील शेत शिवारात असलेल्या दिलीप बालपांडे यांच्या शेतातील विहिरीतून भारतीय अजगर या जातीच्या सापाला बाहेर काढून निसर्गाचे सान्निध्यात जिवदान दिले.
कान्हापूर येथील शेतकरी दिलीप बालपांडे यांच्या शेतातील विहिरीत काही दिवसांपूर्वी एक अजगर जातीचा जवळ जवळ आठ फुट लांबीचा व पंधरा किलो वजनाचा साप भक्शाच्या शोधात असताना अचानक विहिरीत पडला परंतु त्यास बाहेर निघता येत नव्हते. अजगर विहिरीत पडून अल्याचे शेतकरी बालपांडे यांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती हिंगणघाट येथील सर्पमित्र करण विटाळे यांना दिली त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व अनेक तासांच्या परिश्रमानंतर अजगराला विहिरीबाहेर काढून निसर्गाचे सान्निध्यात जिवदान दिले यामुळे शेत शिवारातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Leave a Comment