पती पासून वेगळी राहणाऱ्या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून शेगाव येथे लॉजवर अत्याचार.. चुलत दिराविरुद्ध गुन्हा दाखल

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: पती पासून वेगळ्या राहणाऱ्या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून शेगाव येथे खाजगी लॉजवर नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून आरोपी चुलत दिराविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेने पीडित महिलेने शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की तिच्या पतीसोबत पटत नसल्याने पीडिता ही माहेरी आई-वडिलाकडे राहते, आरोपी उमेश विलास चव्हाण राहणार झोडगा तालुका मलकापूर हा पीडीतेचा चुलत दीर लागतो.

त्यामुळे ओळखीचा फायदा घेऊन त्याने पीडीते सोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले व फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून तीच्या संमतीशिवाय शेगाव येथे खाजगी गेस्ट हाऊस वर नेऊन मी तुझ्यासोबत लग्न करतो

असे सांगून शारीरिक संबंध ठेवले व लग्नाला नकार दिला व ठग बाजी केली अशा तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी उमेश विलास चव्हाण वय 23 वर्ष याच्या विरुद्धकलम ३७६,417 भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास महिला पीएसआय कुवारे मॅडम करीत आहेत

Leave a Comment