पत्रकार गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अग्रवाल हॉस्पिटल येथे 21 सप्टेंबर रोजी अस्थिरोग तपासणी शिबिर

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

खामगाव:- पत्रकार गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सव निमित्त दि. 21 सप्टेंबर गुरुवार रोजी अग्रवाल हॉस्पिटल, जलंब रोड, गोकुळ नगर, थेटे हॉस्पिटल जवळ खामगाव येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अस्थिरोग तपासणी शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश अग्रवाल हे रुग्णांची तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन देणार आहेत. शिबिरामध्ये बी.एम.डी. टेस्ट म्हणजे हाडाच्या ठिसूळतेची मशीनद्वारे तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच एक्स-रे तपासणी शुल्क मध्ये 50% सूट राहील. तरी संबंधित सर्व नागरिकांनी अग्रवाल हॉस्पिटलच्या मो. नं. 8605779989, 7218998933 वर नाव नोंदणी करून या सुवर्ण सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यगण यांनी केले आहे.

Leave a Comment