Home बुलढाणा पत्रकार दिनानिमित्त साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकाराचा सन्मान !

पत्रकार दिनानिमित्त साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकाराचा सन्मान !

280
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून संपूर्ण भारत देशांमध्ये साजरा होत असतो !सत्याची बाजू निर्भीड आणि नि:पक्षपाती पणाने मांडण्याचे काम हा पत्रकार करत असतो तसेच घडणाऱ्या घडामोडी ह्या पोलीस च्या मदतीने पोलीस मित्र म्हणून काम करत असतो ।म्हणून आज ६ जानेवारी रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय जितेंद्र आडोळे साहेब तसेच दुय्यम ठाणेदार दीपक राणे यांच्या वतीने आज पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला ‘यावेळी ठाणेदार जितेंद्र आडोळे तसेच दुय्यम ठाणेदार दीपक राणे यांनी सर्व उपस्थित पत्रकारांना नोटबुक पेन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला ‘येळी पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी भगवानराव साळवे ।लोकमतचे तालुका प्रतिनिधी अशोक इंगळे दिव्य मराठीचे संतोष गाडेकर ‘ज्येष्ठ पत्रकार लोकमत समाचार चे अमिन शहा .दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी मनोज पऱ्हाड ‘ ‘दैनिक पुण्यनगरी ‘ दैनिक लोकमंथन ‘ तसेच भारत संग्रामचे तालुका प्रतिनिधी सचिन खंडारे ‘बुलढाणा लाईव्ह चे अमोल साळवे ।दैनिक मातृभूमी दैनिक सामना चे प्रतिनिधी दर्शन गवई ‘दिव्य मराठीचे वसीम शेख ‘साखरखेडा पुण्यनगरीचे गजानन इंगळे ।आदी पत्रकाराचा यावेळी सन्मान करण्यात आला ‘यावेळी पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी भगवान साळवे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकाराला मदत मिळणे गरजेचे असून पत्रकार हा अडीअडचणी मध्ये बातमीचे वार्तांकन करत असतो ।यावेळी ठाणेदार जीतेंद्र आडोळे यांनी सुद्धा मार्गदर्शन करताना सांगितले की पत्रकार हा पोलीस मित्र म्हणून काम करत असतो ‘अनेक एक दुर्लक्षित घटना ह्या पत्रकार मुळे उजेडात येत असतात ‘यावेळी अनेक गावचे पोलीस पाटील सुद्धा उपस्थित होते !शेवटी चहा व नाष्टा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ‘यावेळी दुय्यम ठाणेदार दीपक राणे पोलिस स्टेशनचे पोलिस अरविंद चव्हाण श्री मापारी सर्व पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील उपस्थित होते ।

Previous articleअखेर हर्षल फदाट(बापू) यांच्या प्रयत्नाला यश.. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव..!!
Next articleपशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळा बदलल्या ।शासनाची मान्यतेला मंजुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here