Home Breaking News पदमपूर परिसरात भुकेमुळे तीन वर्षीय बिबट्याचा मृत्यू

पदमपूर परिसरात भुकेमुळे तीन वर्षीय बिबट्याचा मृत्यू

333
0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

आमगाव- तालुक्यातील पदमपूर गाव परिसरात वाघ नदीच्या कटेवर संरक्षित वन कम्पार्टमेंट 489 मध्ये एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. ही घटना 2 फेब्रुवारीला समोर आली असून हा नर जातीचा बिबट्या आहे. या बिबट्याचा भूकेने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

गोंदिया जिल्ह्यात बिबट्या आणि वाघांची शिकार झाल्याची दोन मोठी प्रकरणे समोर आली आहेत. यातच आमगाव तालुक्याच्या पदमपुर येथील वाघ नदीच्या परिसरात संरक्षित वनात वन विभागातील कर्मचारी व वन मंजूर वन परिसरात गस्त करत असताना त्यांना एक बिबट मृतावस्थेत आढळा. या विषयी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता वन विभागाचे अधिकारी घटना स्थळावर दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत त्या मृत बिबट्या ला आमगाव येथी वन विभाग कार्यलयात आण्यात आनले. या घटनेमुळे विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

बिबटाची करंट लावून शिकार तर करण्यात आली नाही ना या बाजुने देखील वनाधिकाऱ्यांनी तपासाला सुरूवात केली आहे. मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याची उत्तरीय तपासणी केल्यावर त्याच्या मृत्यु भुकेमुळे झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. उत्तरीय तपासणी आमगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. कोटांगले व डॉ. रहांगडाले यांनी केली. या घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्राधिकारी अभिजीत इमलकर, क्षेत्रसहायक बी. पी. राउत, वनरक्षक नितीन लांजेवार, ढगे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे यांना गोंदियावरून पाचरण करण्यात आले होते. हा बिबट तीन वर्षांचा असल्याचे सांगितले जाते. त्या मृत बिबट्याचा पंचनामा करत त्यांचे शव विच्छेदन करण्यात आले असून त्याचे वनविभागा द्वारे अंतसंस्कार करण्यात आले.

Previous articleखाऊचा जमवलेला निधी भव्य श्रीराम मंदिरासाठी देऊन चिमुकल्या हिंदवीने उचलला खारीचा वाटा
Next articleपुणे येथे दिनांक ३१ जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषद मध्ये शरजील उस्मानी या व्यक्ती ने हिंदू समाजावर केलेल्या वक्तव्या बद्दल अटक करून गुन्हा दाखल करण्या बाबत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here