पर्यटकाच्या वाहनाला अपघात होऊन 2 ठार

 

गोंदिया-शैलेश राजनकर

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पालगत असलेल्या चिमूर ते कोलारा मार्गावर तुकूम फाट्याजवळ मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास पर्यटकाच्या वाहनाला अपघात होऊन एक मुलगी व तिचे काका ठार झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात 4 पर्यटक जखमी झाले आहेत. सना गोयल (13) असे मृतकाचे नाव आहे. जखमीपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून नागपूरला हलविले. दोघांवर चिमूर येथेच उपचार सुरू आहे. फोर्ड कार क्रमांक MH49 2489 ला अपघात झाला आहे. या कार मध्ये चालक ज्ञानेश्वर वसंता नरड वय ३८ वर्षे , मिनू अमिनेश अग्रवाल ३२ वर्षे , नेहा आशिष अग्रवाल वय ३६ वर्षे , ईशु अनिमेश अग्रवाल वय १७ वर्षे असे एकूण ६ जण होते.या सहा पैकी २ चे मृत्यू झाले असून ४ जणांवर उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.

Leave a Comment