हिंगणघाट। मलक नईम
कोविड संकटामुळे मागील दोन वर्षे गणेशोत्सव भाविकांना साधेपणाने साजरा करावा लागला या वेळी निर्बंध नसल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, हिंगणघाट शहरातील सर्व गणेश भक्तांना सुविधा व्हावी या करिता नगर परिषद प्रशासना मार्फत ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत शहरातील एकूण ५ ठिकाणी कुत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात येणार आहे.संभाव्य प्रदूषणाला आळा बसून पर्यावरणपूरक पद्धतीने श्री गणेश मूर्तींचे विसर्जन व्हावे हा यामागील मुख्य उद्देश आहे. सर्व विसर्जन ठिकाणी निर्माल्य जमा करण्याकरिता निर्माल्य कुंडाची व्यवस्था नगर परिषदे मार्फत केली असून सर्व भाविकांनी या कुंडा मध्येच निर्माल्य देण्याचे आवाहन नगर प्रशासना मार्फत करण्यात येत आहे.नगर परिषद प्रशासना मार्फत खालील ठिकाणी विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
१) गोकुळधाम मैदान,तहसील कार्यालया जवळ, २) संत गजानन महाराज मंदिर परिसर,तुकडोजी वार्ड
३) हनुमान मंदिर परिसर,इंदिरा गांधी वार्ड,ए.पी.एम.सी.मार्केट यार्ड जवळ, ४) पटवारी कॉलनी,सांबरे यांचे घर समोरच्या मोकळ्या जागेवर, ५) सेन्ट्रल वार्ड,चेपे चौक जवळ
वरील सर्व विसर्जन ठिकाणी भाविकांना सुविधा देणे साठी नगर परिषदेचे प्रत्येकी ३ कर्मचारी सेवा देणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने आपल्या घरीच किवा नगर परिषदेने तयार केलेल्या कुत्रिम विसर्जन कुंडामध्ये करून नगर परिषद प्रशासनास सहकार्य करण्याचे आव्हान नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.हर्शल गायकवाड यांनी केले आहे.