आधार फाउंडेशन द्वारा वृक्षारोपण मोहिमेच्या शुभारंभ
हिंगणघाट:- नईम मलक
दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत आहे, त्यामुळे निसर्गाला वाचवण्यासाठी झाडे लावणे व ती जगवणे, पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी बस स्थानक येथे वृक्षारोपण करतांनी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले.
आधार फाउंडेशन हिंगणघाट च्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण मोहिम राबविली जाते दि.०६ जुलै रोज बुधवार ला स्थानिक बस स्टॉप परिसरात भव्य स्वरूपात वृक्षारोपन मोहिमेच्या शुभारंभ संपन्न झाला वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून
उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार सतिश मसाळ, आगार प्रमुख सतीश नेवारे, आधार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले, कार्यकारी अध्यक्ष लक्ष्मीकांत धार्मिक, सचिव गजानन जुमडे,, पर्यावरण समितीचे प्रमुख सुरेश गुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी आधार फाउंडेशनच्या विविध उपक्रमाचे कौतुक करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.सोबतच या कार्यक्रमासाठी पत्रकार संघाच्या वतीने सतिश वखरे,राजेश कोचर व सी.सी. टी. एफ. एम.असोशिएन चे सदस्य ,संतोष ठाकूर आदीची उपस्थिती होती प्रास्तविक सौ.माधुरी विहीरकर यांनी तर आभार पराग मुडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ,डॉ.शरद मद्दलवार,डॉ. प्रा.शरद विहीरकर,राजेश कासवा, डॉ.संजय हिवरकर, चंद्रशेखर निमट प्रा.पोहाणे,प्रा.गिरीधर काचोळे,प्रा.डॉ.राजू निखाडे,गिरधर कोठेकर, अमोल बोरकर,सूनिल भूते,बच्चू कलोडे,राजू गंधारे, प्रवीण श्रीवास्तव,सुभाष शेंडे ,मनोहर ढगे,सुनिल डांगरे,जगदीश वांदीले,तुषार लांजेवार महिला समितीच्या मायाताई चाफले, विरश्री मुडे,अनिता गुंडे, ज्योती धार्मिक,रूपाली मिटकर,शुभांगी वासनिक,निता गजबे, आशा कोसुरकर,अनुराधा मोटवाणी,मंगला शेंडे,जयश्री काचोळे,सिमा तिवारी ज्योती कोहचाडे आदींनी परिश्रम घेतले.