Home पर्यावरण पान पिंपरी व विड्याची पाणे पिक विम्याच्या कक्षेत आणून शेतकऱ्यांना पीक विमा...

पान पिंपरी व विड्याची पाणे पिक विम्याच्या कक्षेत आणून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ द्या या मागणीसाठी दिले निवेदन…

778
0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

पानपिंपरी व विड्याची पाणे ही पिके पिक विमा कक्षात आणून पिंपरी व पानमळा उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा योजना तसेच विविध शासकीय योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी दिनांक 28 सप्टेंबर रोजी बुलढाणा अकोला व अमरावती विभागातील सर्व पानमळा व पिंपरी उत्पादक शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, वानखेड, शेगाव,जलंब तसेच जळगाव जामोद तालुक्यातील जामोद सुनगाव जळगाव पिंपळगाव काळे ,चारठाणा, शेंदुर्णी, शिरसोली, मोताळा, तसेच इतर भाग अकोला जिल्ह्यातील दानापूर, वारखेड, सोनवाडी, हिवरखेड, खंडाळा, चंद्रपुरी, आडगाव, उमरा, बोर्डि, अकोट, अकोली जहागीर, शिवपुर, देवठाणा ,अकोलखेड, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, पांढरी, अचलपूर, शिरसगाव, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड ह्या भागातील शिवरात पान मळ्याची व पान पिंपरी यांची शेती करण्यात येते परंतु पानमळा विशिष्ठ रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानमळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत यानंतर आजमितीला या भागात मोठ्या प्रमाणावर पानपिंपरी हे औषधी वनस्पती पिके घेण्यात येते ह्या सर्व भागात मिळुन अंदाजे 500 हेक्‍टर इतक्‍या क्षेत्रावर पानपिंपरी चे पीक घेण्यात येते आयुर्वेदिक औषधी गुणांनी परिपूर्ण असल्यामुळे औषधी वनस्पती म्हणून पानपिंपरी या पिकाला संपूर्ण देशात मोठी मागणी आहे या भागात मोठ्या संख्येने वस्ती करून राहत असलेल्या बारी समाजाचे हे परंपरागत पिक असून या भागातील मोठ्या संख्येने मजूर वर्गाची उपजीविका देखील त्या पिकावर अवलंबून आहे व काही शेतकरी स्वमालकीच्या आणि भाडे पट्ट्याच्या क्षेत्रावर लागवड करतात परंतु मागील काही वर्षापासून या पिकाच्या उत्पादनाकरिता येणारा मोठा खर्च गारपीट वादळी वारे अति जास्त व कमी तापमान निसर्गाचा असमतोल किडींचा प्रादुर्भाव यासारख्या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती तसेच कृषी विभाग कृषी विद्यापीठ यांची या पिकांची संशोधन शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन या बाबत असलेली अनास्था आणि शासन दरबारी याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे शासनाने ह्या शेतकऱ्यांच्या पान पिंपरी व विड्याची पाने या पिकाना पिक विम्याच्या कक्षेत घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन सर्व शेतकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना देण्यात आले निवेदनावर श्रीकृष्ण केदार, गोपाल कोथळकर, तुकाराम काळपांडे, रमेश ताडे,सुनील भगत,मधुकर वंडाळे,पांडुरंग म्हस्के,शालीग्राम धुर्डे,शंकर धुर्डे, संतोष धुर्डे,गोपाल धुळे,हिरामण कोथळकार,नामदेव दातीर,अर्जुन घोलप, सखाराम ताडे,माणिकराव राऊत इत्यादींच्या सह्या आहेत

Previous articleवैजापुर गंगापुर विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिंकाचे पंचनामे करा – राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी
Next articleलोकनेते विजय राज शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here