Home Breaking News पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री ना. बच्चू...

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री ना. बच्चू कडू

911
0

 

नासिर शहा
पातुर तालुका प्रतिनिधी

पातुर :-
मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे अनेक तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने खरीप पिकाचे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे शेतजमिनीचे व इतर पिकाचे नुकसान झाले आहेत प्रशासनाने या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवावा व जनतेला दिलासा द्यावा. असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण व कामगार अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना बच्चू कडू यांनी दिले आहे गेल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्प ओवरफ्लो झालेले आहेत मोठ्या धरणातून पाणी सोडण्यात आलेल्या पावसामुळे नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पालक मंत्री आमदार बच्चू कडू यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची मुंबई येथून संपर्क करून आढावा घेतला यावेळी झालेल्या पावसामुळे नदीकाठच्या गावाबरोबरच जिल्ह्यातील इतर ठिकाणांची ही खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन, मूग उडीद, ज्वारी, मका, तूर, कापूस, ऊस, व इतर पिकांची नासाडी झाली आहे पातुर तालुक्यातील गावाचे नावे पिंपळडोळी, चारमोळी , पांडुरणा, चरणगाव ,अंबाशी , चोंडी , सावरगाव ,झंरण्डी, चतारी, पिंपळखुटा , चानी, उमरा, अडगाव, राहेर, भागात केळी पिकाचे ही नुकसान झाले आहे.याशिवाय काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी आल्याने शेतजमिनीचे तसे नागरिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आहे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शेटे ,यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केले अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात यावा असा निर्देशही त्यांनी यावेळी सर्व संबंधितांना दिले हवामान खात्याने जिल्ह्यात शनिवार पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने पुढे काही दिवस पाटबंधारे विभाग तसेच नागरिक शेतकरी व प्रशासनानेही या काळात दक्षता घ्यावी असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे

Previous articleसिरसोली येथिल जिल्हा परिषद उर्दू शाळेत पंचायत समिती गटनेता प्रा संजय हिवराळे यांच्या हस्ते शालेय पोषण आहार वाटप
Next articleघरकुल योजनेतील लाभार्थ्यांना त्वरित लाभ देण्याच्या सूचना बीडीओ इनामदार यांनी कनिष्ठ अभियंत्यांना दिल्या निदैस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here