पी.व्ही टेक्सटाइलच्या स्थापना दिना निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- स्थानिक रोटरी क्लब आणि पी.व्ही.टेक्सटाईल जाम यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात पी.व्ही. टेक्सटाइल कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना कंपनीचे महाव्यवस्थापक श्री.भूपेंद्रजी शहाणे यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.

रोटरीच्या कार्याची माहिती देताना रोटरीचे अध्यक्ष पराग कोचर यांनी एक हजार युनिट रक्तदान करण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला.142 रक्तदात्यांनी रक्तदान करून इतिहास रचला.

शाकीर खान पठाण, रोटरी क्लबचे सचिव डॉ.सतीश डांगरे, प्रा. अशोक बोंगीरवार, प्रा. राजेंद्र निखाडे, प्रा. माया मिहानी, पंकज देशपांडे, पुंडलिक बकाणे, प्रणय डागा, चेतन पारेख, संजय चांभारे यांनी सहकार्य केले.

Leave a Comment