पुन्हा एकदा सिंदीच्या ऐतिहासिक तान्हा पोळ्याचे दैवत्व सिंध्द

 

हवामान विभागाचा ऐलो अर्लट ठरविला चुकीचा

ऐतिहासिक तान्हा पोळा महोत्सवात पाऊसाचा थेंब नाही

सिंदी रेल्वे ता.१७ : विदर्भ विख्यात ऐतिहासिक सिंदी रेल्वेचा तान्हा पोळा महोत्सव यंदाही मोठ्या थाटामाटात झाला साजरा…..!
१४४ वर्षाची परंपरा यंदाही अबाधीत…..!

इसवीसन १९६२ ला सततधार पाऊसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातुन वाहणार्‍या नंदा नदीला पोळ्याच्या दिवशी पुर आल्यांने पोळा नदीपलीकडे आणि अलीकडे असा दोन भागात विभाजीत करुन साजरा करण्यात आला होता या विभाजनामुळे शहर दोन भागात विभागले जाणार म्हणून तत्कालीन पालिका कर्मचारी आणि शहरातील समाजसेवकानी १४ वर्षापासुन पोळ्यापासुन अलीप्त असलेला श्री जयस्वाल यांचा मानाचा नंदी पोळ्यात काढुन हा ऐतिहासिक पोळा साजरा केला आणि या मानाच्या नंद्याला साकडे घातले की पुन्हा पोळ्याच्या दिवशी पाऊस ऐवू देऊ नको आणि पोळा विभाजीत व्होवू देऊ नको…..

.आणि तेव्हापासून इतिहास आहे की सिंदी रेल्वेच्या ऐतिहासिक तान्हा पोळा महोत्सव कधीही पाऊसामुळे खंडीत झाला नाही.
यंदा मात्र शुक्रवारी (ता. १५) हवामान विभागाने संपूर्ण वर्धा जिल्हा एलोअलर्ट जाहीर केला होता शिवाय सकाळ पासून वर्धा नागपूर हिंगणघाट सोबतच सिंदी शहरातपण पाण्याची मुसळधार बॅटींग सुरु होती. हे पाहुन सर्व म्हणायचे यंदा पोळ्याचा इतीहास कोलमडेल महोत्सवास पाऊस खंड देणार पण आराध्य दैवत नंदीबैलाने लाज राखली जागृत दैवत्व पुन्हा एकदा सिध्द झाले.

पाऊस थांबला…आणि सिंदी रेल्वे येथील ऐतिहासिक वारसा लाभलेला तान्हा पोळा महोत्सव त्याच दिमाखात साजरा झाला.
नगरपालिकेच्या वतीने आयोजित पोळा महोत्सवाला आमदार समीर कुणावार अध्यक्षस्थानी होते तर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, भाजपा महामंत्री किशोर दिघे, पोलीस अधीक्षक नरुल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, उप विभागीय पोलीस अधीक्षक प्रमोद मंकेश्वर, समुद्रपूर तहसीलदार कपील हटकर आदीची प्रमुख उपस्थीती होती.

यावर्षी राष्ट्रवादी आणि हरदुलाल युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निघालेल्या जीवंत कलाकारांच्या शंकरजीच्या भस्म तांडव नृत्यांने लक्ष वेधले.
यंदाच्या पोळ्यात पारंपारीक ऐतिहासिक ११ विशालकाय नंदी आणि त्यासोबत नयनरम्य देखावे झाक्यातुन सादर झाले तर नव्याने संदीप दुम्पलवार यांचा देखणा नंदीबैल यावर्षी सहभागी होत पोळ्याची शान बनला.

याशिवाय विविध स्पोर्टिग कल्ब, समाजसेवी संघटना, राजकीय पक्ष, यांनी डिजे आणि कांच्या वाद्याच्या तालावर चक्क चौदा झाक्यातील लक्षवेधी देखाव्यानी उपस्थित पोळाप्रेमीच्या डोळ्याचे पारने फेडले.
दुरवरुन आलेल्या पोळाप्रेमीची लाखाहुन जास्त गर्दी पाहण्यात आली. तर पोलिस विभागा तर्फे तगडा बदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोग्य विभाग आणि महावितरन विभागाने आपली जबाबदारी चोख बजावीली तर पालिकेने उत्तम नियोजन केले होते.
सर्व नंदी आणि झाॅक्याचे परिक्षन अॅड परिक्षित पेटकर, मोहन सुरकार, प्रा. उत्तम वानखेडे यांनी करुन निकालानुसार मान्यवराच्या हस्ते सर्व नंदी आणि झाॅकीधारकाना शाल श्रीफळ आणि मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन खोडे सर यांनी केले तर आभार पवार सर यांनी मानले. यशस्वीतेसाठी नगर पालिका कर्मचारी तसेच सिंदी शहरवासीयांनी परिश्रम घेतले

Leave a Comment