Home Breaking News पुरात अडकलेल्या तरूणास वाचवतांना, विजय सुरूशे यांचा दुर्दैवी मृत्यु

पुरात अडकलेल्या तरूणास वाचवतांना, विजय सुरूशे यांचा दुर्दैवी मृत्यु

592
0

 

अन तो ठरला देवदूत..

मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील कोराडी धरणावर गावातील काही युवक सकाळी सहा वाजता पोहण्यासाठी गेले असता सांडव्याच्या पाण्यात अडकले. यामध्ये गोपाळ दत्ता जाधव वय 18, विजयानंद किसन कुडके वय 22, शुभम दिनकर गवई वय 22, सलमान जाकिर पठाण वय 22, संतोष सुखदेव माने वय 18, हे तरुण सांडव्यात पोहण्यासाठी गेले,असता अचानक धरणातील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे हे तरुण पाण्यामध्ये वाहून गेले.
यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे अभियंता राजगुरू व कर्मचाऱ्यांनी तात्काळ गावात ही बातमी दिली. गावात माहिती मिळताच गावातील नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, त्यातील सलमान पठान, शुभम गवई ,विजयानंद कुडके यांना सुखरूप बाहेर काढल्या गेले.तर संतोष हा एका झाडाच्या आधराने पाण्यात अडकून होता. मेहकर येथील पोलिस प्रशासनाचे कर्मचारी, व गावातील विजय सुरुशे, आलम पठाण ,अकील पठाण,ऋषिकेश चाळगे,मोहन मगर हे संतोष माने या तरुणाला वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उत्तरले. परंतु त्यामध्ये दुर्दैवाने विजय सुरूशे कुस्ती पैलवान या तरूणाचा पाण्यामध्ये अडकल्यामुळे डोक्याला जबर मार लागून दुर्दैवी मृत्यू झाला. दोन वाजता जिल्हा आपत्ती शोध बचाव पथक, पोलीस प्रशासन, गावातील आलम पठाण ,अखिल पठाण व गावातील तरुणांच्या मदतीने संतोष माने तरूणाला बाहेर काढण्यात यश आले, या मोहिमेमध्ये संभाजी पवार (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ), कृष्णा जाधव ,राजेंद्र झाडगे, प्रवीण साखरे ,वाहनचालक पी.एस खरे (जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा ) पोलीस पथकातील तारासिंग पवार ,हेड -कॉन्स्टेबल दिपक वायाळ ,व त्यांचे सहकारी यांच्यासह मेहकर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आत्माराम प्रधान , उपविभागीय अधिकारी गणेश राठोड ,तहसीलदार संजय गरकळ,पोलीस प्रशासनाचे कर्मचारी, आरोग्य विभाग ,तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मगर,शिवसेनेचे अशोक गाभणे, सचिन मगर, रवींद्र सुरूशे ,कैलास राऊत सह असंख्य तरुण गावकरी हजर होते. प्रशासनाचे कर्मचारी आरोग्य विभाग सह मदत करून चारही मुलांना सुरक्षित बाहेर काढले. परंतु दुर्दैवाने विजय सुरूशे (४०) यांच्या मृत्यूने देऊळगाव माळी गावात सर्वत्र शोककळा पसरली असून त्यांच्या पश्‍चात दोन मुले पत्नी, आई ,भाऊ व वडील असा खूप मोठा आप्तपरिवार आहे. गावकऱ्यांनी “गड आला पण सिंह गेला” अशी भावना व्यक्त करुन जिल्हा आपत्ती उशीरा पोहोचल्यामुळे त्यांच्यावर रोष व्यक्त केला जात आहे. सकाळी सहा वाजता फोन करून सुद्धा आपत्ती व्यवस्थापन विभाग वेळेवर न पोहोचता तब्बल पाच तास उशिरा आले.जर आपत्ती व्यवस्थापन वेळेवर पोहोचले असते तर ही घटना घडली नसती. या दुर्दैवी मृत्यू ला आपत्ती व्यवस्थापन जबाबदार आहे असा रोष गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

 

Previous articleआज बोरदहेगाव मध्यम प्रकल्पात अनेक वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात जलसाठा (पाणीसाठा) झाल्याने
Next articleखामगाव भालेगाव तात्काळ पंचनामे करा निलेश देशमुख थेट शेतकरयाच्या बांधाव र पोहचले व नुकसान ग्रस्त शेतकरयाची पिकांची पाहणी केली …… .पावसाचा तडाखा…पिके उध्वस्त..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here