पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण सुनगाव येथे वाहिली शहिदांना श्रद्धांजली…

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

देशाला हादरवून सोडणाऱ्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली. 14 फेब्रुवारी 2019 साली झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले होते. देशभर या शहिदांचे स्मरण करण्यात येत असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.यानिमित्त जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे दिनांक १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी श्रध्दांजली पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी शिव स्वराज्य गृप,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, जय शिवराय जगदंबा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.सुत्रसंचालन गणेश वसुले यांनी केले. तर सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी अशोक काळपांडे, महादेवराव धुर्डे, गुणवंराव कपले,नवनियुक्त सरपंच रामेश्वर अंबडकार,मोहनसिंह राजपुत, पत्रकार गजानन सोनटक्के, अनिल भगत, रवी बानाईत,संदिप धुळे, अतुल गिर्हे, विशाल वसुलकार,रमेश वंडाळे, आनंद धुळे, स्वप्निल वंडाळे,स्वप्निल तेटु,योगेश गवई,पंकज भगत, प्रविण रौदळे,शुभम कापरे,राजु येउल,रवि घोलप,रामदास धुळे, गणपत अंबडकार, विठ्ठल तेटु,शरद वानखडे, ऋषिकेश येउल, गौरव घोपे, रवि दामधर, समाधान धुळे, विनोद ढगे यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Leave a Comment