पूरग्रस्त च्या नावावर मिळालेल्या प्लॉट मध्ये हेराफेरी करून केला भ्रष्टाचार

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- सरकारी दवाखान्या मागे पूरग्रस्तांना पट्टे वाटप करण्यात आले . पट्टा दुसऱ्याच्या नावावर व हिंगणघाट नगरपालिकेत टॅक्स पावती दुसऱ्याच्या नावावर ? असच एक प्रकरण समोर आले.
पूरग्रस्त प्लॉट जानबा धोंडबा टिकले राहणार हनुमान वार्ड नंबर 554 या नावाने पट्टा मिळाला परंतु हा प्लॉट त्याचा मुलगा बापूराव जानबाजी टिकले रा.हनुमान वार्ड याने दि.18 – 4 -2000 ला दुय्यम निबंधक हिंगणघाट येथे विक्री करून दिले . त्यामुळे या विक्री व्यवहारात नामदेव जानबा टिकले रा.शास्त्री वार्ड हिंगणघाट यांनी वर्ष 2000 मध्ये हिंगणघाट दिवाणी न्यायालय येथे पूरग्रस्त प्लॉट बद्दल प्रकरण दाखल केले यांचे प्रकरण जयस्वाल वकील यांच्याकडे होते . या प्रकरणात कोणताही निर्णय झाला नाही. उलट हे प्रकरण खारीज करण्यात आले त्यानंतर या प्लॉट कडे दुर्लक्ष झाले यादरम्यान या जागेवर नितीन वाघमारे या इसमाने दोन मजली इमारत बांधली . 2016 मध्ये विजय नामदेवराव टिकले याने माहिती अधिकारात सर्व कागदपत्रे काढून पुन्हा या प्रकरणात हात घातला. व त्याच्या आधारे पूरग्रस्त यादी ,करारनामा, हिंगणघाट रजिस्टर दुय्यम निबंधक येथील विक्रीपत्र ही सर्व कागदपत्रे जमा केली व त्याच्या आधारे हिंगणघाट नगरपालिका मुख्याधिकारी याच्याकडे तक्रार केली की, हा प्लॉट नंबर 554 जानबा धोंडबा टिकले या नावाने आहे पूरपीडित पट्टा आहे याची विक्री होत नाही ? हिंगणघाट दुय्यम निबंधक अधिकारी याने खरेदी विक्री व्यवहार करून दिला . व त्याच्या आधारे हिंगणघाट नगरपालिकेत नाव नोंद करण्यात आले व त्याच्या आधारे टॅक्स पावती करण्यात आली हा सर्व बोगस व्यवहार असल्यामुळे या प्लॉट ची दाखल खारीज रद्द करण्यात यावी अशा प्रकार ची तक्रार केल्यावर सुद्धा मुख्याधिकारी जगताप याने कारवाई न करता दाखल खारीज रद्द केली. सगळे पुरावे असताना सुद्धा न्याय मिळत नव्हता .
पूर पीडीत पट्ट्याचा करारनामा चे रूपांतर आखीव पत्रिका मध्ये दि. 8-8-2019 ला करण्यात आले. त्याच्या आधारे दिनांक 31 ऑगस्ट 2019 ला हिंगणघाट भूमी अधीक्षक साहेब यांच्याकडे रीतसर आवक-जावक मध्ये अर्ज केला यामध्ये आखीव पत्रिकेमध्ये 1) जानबा धोंडबा टिकले
2) बापूराव जानबा टिकले हे नाव चढवण्यात यावे संबंधित अर्ज केलेला आहे तसा पुरावा आहे .नाव चढण्यासाठी 10000 रुपयाची मागणी केली होती . पैसे नसल्यामुळे हे प्रकरण जैसे थे तसेच राहिले व पुढे कोरोनामुळे याकडे दुर्लक्ष झाले. याच प्रकरणात पैसे देऊन 2019 मध्ये मरण पावलेल्या व्यक्तीला 26-6-2022 मध्ये जिवंत दाखविले व त्याची वारसान म्हणून नोंद केली . अधिकारी यांनी मोका चौकशी सुद्धा केली. यावरून या विभागात किती भ्रष्टाचार आहे व त्या संबंधीचे सर्व पुरावे आहेत वरिष्ठान कडून याकडे लक्ष देणार की प्रकरण दडपणार ?

Leave a Comment