पोलिस प्रशासनाचा रेती ट्रक -ट्रॅक्टर चालक – मालक यांच्यावर बेकायदेशीर गुन्हे दाखल !

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक नुरुल हसन हे अवैध धंद्यांना बंद करण्याकरिता अतोनात प्रयत्न करत आहे. हि जनतेसाठी अभिनंदनाची बाब आहे.परंतु सर्वच कामात पोलीसांची प्रमुख भूमिका दिसून येत आहे, तालुक्यातील महसूल प्रशासनाचे काम सुद्धा पोलिस प्रशासन करीत आहे अवैध रित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रक- ट्रॅक्टर चालक मालक यांचेवर भादवी ३७९ अंतर्गत गुन्हा नोंदवुन नाहक त्रास देत आहे. ते नियमानुसार नाही आहे. पावसाळा संपला की सर्व सामान्य जनता आपल्या घराची कामे काढतात, यांना रेती पुरवणाऱ्यांवर पोलिस बेकायदेशीर कारवाई करत आहे ? हे काम महसूल प्रशासनाचे आहे परंतु हे सर्व अवैध रित्या पोलिस प्रशासन करीत आहेत जनतेला बांधकाम सुरू करण्यासाठी रेतीची आवश्यकता आहे त्याकरिता महसूल प्रशासनाचे रेती घाटाचे रितसर लिलाव करून रेती साठा जनतेला उपलब्ध करून देण्यात यावा तो दिला नाही, पोलीसांच्या होत असलेल्या कारवाई मुळे ट्रक, ट्रॅक्टर, टिप्पर चालक मालक यांचेवर भादवी ३७९ सारखे गुन्हे दाखल करण्यात येत आहे,अशे गुन्हे दाखल करून सर्व सामान्य मजुर यांचे घर उध्वस्त करत आहेत,या या कामामुळे मोठ्या प्रमाणात मजुर वर्गाचे घर चालत असते आणि त्यावरच स्थानिक पोलीस प्रशासन बेकायदेशीर गुन्हे दाखल करून त्यांचे घर उध्वस्त करत आहे. पोलीसांनी कायदा, सुव्यवस्था, गुंडागर्दी यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे दारू गांजा जप्त करण्याचे सोडून हे मुरुम ,रेती मालकावर बेकायदेशीर गुन्हा दाखल करीत आहे. अनेक परिवारावर भुकमारीचे संकट निर्माण करित आहे.तसेच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खुप नुकसान झाले आहे ते बिचारे पोटासाठी वणवण करत हाताशी येईल ते काम करुन आपल्या मुलांना दोन वेळचे जेवण देण्याची धडपड करत आहेत, रोजगार नाही, नोकरी नाही, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही अशा परिस्थितीत ते हमाली करून पोट भरतात आणि जर त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने गुन्हे दाखल केले तर त्यांना उपाशी मरावं लागेल तेव्हा अशा होणाऱ्या अवैध कारवाया पोलिस प्रशासनाने त्वरित थांबवावी आणि जिल्हा महसूल प्रशासनाचे व तालुका महसूल प्रशासनाचे अधिकारी यांनी आपले लक्ष देऊन महसूल विभाग नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील रेती घाटाचे कायदेशीर पद्धतीने लिलाव करून रेती उपलब्ध करून द्यावी जेणेकरून राज्यातील खनिज संपत्ती ची अवैध चोरी होणार नाही आणि मोल ,मजुर, आणि ट्रक – ट्रॅक्टर चालक मालक यांचेवर भविष्यात उपासमारीची वेळ येणार नाही व बेरोजगार तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांचे भविष्य उध्वस्त करण्याचे प्रयत्न पोलिस प्रशासनाने करू नये अशी मागणी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी यांनी आमदार समीर कुणावर यांना निवेदनातून केली आहे.

Leave a Comment