इस्माईल शेख शेगाव
शेगाव :- विदर्भ पंढरी संतनगरी शेगाव (भुसावळ विभाग) NSG-3 दर्जाचे रेल्वे स्थानक सुपरफास्ट गाड्यांना थांबा आणि इतर सर्व सुविधा श्रींच्या प्रगट्य महोत्सवात शेगावी येणाऱ्या प्रवासी भक्तांना मिळाव्यात म्हणून ग्राहक पंचायत शेगाव तर्फे दोन निवेदने देन्यात आले.
विदर्भातील पंढरी संत नगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचे मंदिर येथे आहे, येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. या भाविकांच्या प्रवासासाठी रेल्वे मार्ग सोपा आहे. भारतभरातून भाविक रेल्वेने येथे पोहोचतात.
तसेच शेगाव परिसरात तीन अभियांत्रिकी महाविद्यालये व विविध शैक्षणिक संस्था असल्याने अनेक राज्यातील विद्यार्थी शेगाव स्थानकात शिक्षणासाठी येतात. शेगाव स्थानकाला रेल्वे विभागाने NSG-3 दर्जा दिला असून या स्थानकाला तिकीटातून वार्षिक उत्पन्न 20 ते 25 कोटी आहे.
शेगाव स्थानकात मालधक्का (मालधक्का) सुरू करण्यासाठी शेगाव स्थानकात जमीन व ट्रॅक उपलब्ध असून, यातून तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून शेगावमधून रेल्वेचे उत्पन्न वाढणार आहे, त्यामुळे ते सुरू होणे गरजेचे आहे.
शेगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा मिळावा यासाठी नगर परिषद शेगाव सह ४६ ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर केला आहे. खामगाव शहरासाठी शेगाव स्थानक सोयीचे आहे..
शेगाव स्थानकावर खालील गाड्यांचा थांबा आणि विस्तार आवश्यक आहे
सोबहतच विदर्भातील पंढरी संत नगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचे मंदिर येथे आहे, येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात.
या भाविकांच्या प्रवासासाठी रेल्वे मार्ग सोपा आहे. भारतभरातून भाविक रेल्वेने येथे पोहोचतात. तसेच शेगाव परिसरात तीन अभियांत्रिकी महाविद्यालये व विविध शैक्षणिक संस्था असल्याने अनेक राज्यातील विद्यार्थी शेगाव स्थानकात शिक्षणासाठी येतात. श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने दि.
शेगाव येथे मोठ्या संख्येने भाविक व यात्रेकरू येण्याची शक्यता आहे . प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी ट् भुसावळ नागपूर प्यासिंजर सुरू करणे आवश्यक आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी शेगाव रेल्वे स्थानकावर अतिरिक्त तिकीट कार्यालये व अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करणे आवश्यक आहे.
असे वरील निवेदनात नमूद आहे या निवेदनावर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेखर नागपाल रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजय त्रिवेदी , राजेश अग्रवाल , मुकिंदा खेळकर , एड पुरुषोत्तम डांगरा , व राजेश सुरवाडे यांच्या सह्या आहेत .