प्रधान तंत्रज्ञ आनंद निकम यांना गुणवत कामगार पुरस्कार प्रदान

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

शिंदी ता. भुसावळ येथील
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तर्फे सन २०२२ – २३ या वर्षीचा गुणवंत कामगार पुरस्कार भुसावळ उपविभाग ग्रामीण – १ मधून शिंदी कक्ष ता. भुसावळ येथील प्रधान तंत्रज्ञ मा. आनंद वसंत निकम यांना

१ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून महावितरण जळगांव परिमंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांना सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन प्रदान करण्यात आला.

मा. आनंद निकम हे एम.एस.ई.बी. तील माजी कर्मचारी दिवंगत वसंत धुडकू निकम यांचे चिरंजीव आहेत.

आनंद निकम यांना पुरस्कार मिळाल्या प्रित्यर्थ त्यांचे विद्युत विभागातील सर्व कर्मचारी संघटना तसेच सामाजिक नेते , मित्र मंडळी, नातेवाईक यांच्यातर्फे सर्व स्तरातून त्यांचे अभिनदन होत आहे.

Leave a Comment