प्रल्हाद भाऊ सोरमारे यांचे सामाजिक काम !बुलढाणा जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णासाठी औरंगाबाद मध्ये राहण्याची व जेवण्याची केली व्यवस्था !

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील बहुजन समाजाचे नेते तथा शेतकरी चळवळीतील खंदे कार्यकर्ते ‘प्रल्हाद भाऊ सोरमारेयांनी आपल्या मातृत्वाची नाळ अजूनही जोडलेली असल्याचे दाखवून दिली आहे !कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता प्रल्हाद सोरमारे यांनी !बुलढाणा जिल्ह्यातून उपचारासाठी औरंगाबाद मध्ये कोणत्याही हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या गरजू रुग्णांसाठी समजिक दायित्व म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रल्हाद भाऊ सोरमारे युवा मंच यांच्या वतीने रुग्णांच्या परिवारांची त्यांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था बीड बायपास वर असलेल्या न्यू शुभम लॉन वर केली आहे !त्यामुळे गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना हा मोठा आधार झाला आहे !कोरोना च्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी हेळसांड गैरसोय औरंगाबाद शहरामध्ये होत असते परंतु प्रल्हाद भाऊ सोरमारे यांनी मनाचा उदारपणा दाखवल्यामुळे अनेक रुग्णांच्या परिवाराची आता सोय झाली आहे

Leave a Comment