Home Breaking News प्रहार संघटनेचे रिकाम्या खुर्चीला हार टाकून आंदोलन

प्रहार संघटनेचे रिकाम्या खुर्चीला हार टाकून आंदोलन

339
0

 

पातूर पंचायत समिती चा कारभार वाऱ्यावर

नासिर शहा
पातुर तालुका प्रतिनिधी

पातूर /: तालुक्यातील पिंपळखुटा येथील डी.पी. ई. एस.विद्यालयाच्या एका खोलीतून मुख्याध्यापक चव्हाण आणि वाहनचालक हे दोघे एका मालवाहू वाहनाचा चालक शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळेला मिळालेल्या तांदळाचे पाच कट्टे वाहनामध्ये भरत असताना ग्रामस्थांनी मुख्याध्यापक चव्हाण, आणि वाहनचालकास दोघांना पकडले परंतु दोघेही शाळेच्या आवारातून पसार झाले या प्रकरणात चान्नी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असता, पोलीस कारवाई करीता पंचायत समिती च्या अधिकारींकडून लेखी तक्रार आवश्यक असल्याचे कळविण्यात आल्याने प्रहार संघटनेचे अरविंद पाटील यांनी पातूर पंचायत समितीचे बीडीओ. समाधान वाघ व गटशिक्षणाधिकारी अनिल अकाळ यांना तक्रार करण्याची मागणी केली.
सदर घटनेला पाच दिवस उलटूनही अजूनपर्यंत अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करण्याची तसदी घेतली नसल्याने आज प्रहार संघटनेचे पदाधिकारी पातूर पंचायत समितीला आले असता अधिकारी हजर नसल्याने पंचायत समितीचे बीडीओ समाधान वाघ व गटशिक्षणाधिकारी अनिल अकाळ आपल्या कार्यालयात हजर नसल्याने त्यांच्या रिकाम्या खुर्च्यांना हार टाकून आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रहार संघटनेचे अरविंद पाटील,दत्ता सुडोकार, जिवन उपर्वट,मंगेश इंगळे,नितीन इंगळे,गणेश रणपिसे ,दत्ता वाघ,अंकुश बुंधे,राहुल देशमुख,रविंद्र निंबोकार आदी प्रहरसेवक उपस्थित होते.

Previous articleवादळी पावसामुळे पीक नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ मदत जाहीर करा- प्रा. मोहन रौंदळे यांची मागणी
Next articleमातंगपुरी परिसरातील नागरिक चार वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here