प्रा.डाॅ.बबन मेश्राम यांच्या जनसंवाद माध्यमे व सांस्कृतिक परीवर्तन पुस्तकाचे लोकार्पण

 

गोंदिया:- एन.एम.डी महाविद्यालयतील समाजशास्त्र विभाग प्रमुख,रातुम नागपुर विद्यापिठातील समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य व साहित्यिक प्रा.डाॅ.बबन मेश्राम लिखित जनसंवाद माध्यमे व सांस्कृतिक परीवर्तन या पुस्तकाचा लोकार्पण संविधान दिनी २६ नोव्हेंबर ला

उत्तर प्रदेशातील बलरामपूरच्या दक्षिणेला व अयोध्येच्या उत्तरेस राप्ती ( अचिरावती ) नदीकाठी बसलेल्या बौद्धांच्या पाली वाङ्‌मयात सावित्थी असा श्रावस्तीचा उल्लेख असलेल्या, जैन वाङ्मयात त्यास चंद्रपूर वा चंद्रिकापुरी संबोधले जाते,तर विष्णुपुराण व हरिवंशपुराण यांच्या मतानुसार युवनाश्व राजाचा मुलगा श्रावस्त याने वसविलेल्या, श्रावस्ती येथे भगवान बुद्ध यांनी अधिक वर्षापर्यंत, वर्षवास निमित्त निवासी होते अशा बौद्ध धम्माच्या सर्वात पवित्र ठिकाणी करण्यात आले.

महिला सशक्तिकरण संघ द्वारा श्रावस्ती येथिल म्यानमार मोनास्ट्रि येथे आयोजित चतुर्थ आंतराष्ट्रीय बौद्ध सम्मेलनात डॉ.बबन मेश्राम यांच्या पुस्तकाचे लोकार्पण सम्राट अशोक सुभारती स्कूल ऑफ बुद्धिस्ट,सुभारती विश्वविद्यालय मेरठचे पाली विभाग प्रमुख डॉ.चंन्द्रकिर्ति यांच्या हस्ते कुशिनगर येथिल अग्नमहापंडित भदन्त ज्ञानेश्वर, भदन्त देवेन्द्र, भदन्त नंदरत्न थेरो, दिल्ली चे भदन्त करुणाकर, म्यानमार येथिल भदन्त ओभाषा, भदन्त नायका, भदन्त पंडिताभिवंसा,लंडन चे डॉ.मंजुलाल, डॉ.निलीमा बागडे,भंन्ते विनाचार्य, डॉ.अश्विर गजभिए डॉ.शुशांत चिमणकर, सामाजिक कार्यकर्ता आतिष बागडे यांच्या उपस्थित करण्यात आले.

सदर पुस्तकाचे प्रकाशक वैनगंगा व्हॅली लोटस अॕन्ड कोब्रा पब्लिशिंग हाउस नागपुर हे आहेत.डाॕ.मेश्राम यांच्या संशोधनावर हि पुस्तक असून विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तसेच संशोधनकर्ता, आदिवासीच्या जिवनावर अध्ययन करणारे अभ्यासक यांना उपयुक्त असणारे पुस्तकात जनसंवाद माध्यमे व सामाजिक परीवर्तन, आदिवासी, आदिवासीतील सांस्कृतिक व धार्मिक बदल, आदिवासीतिल सामाजिक व आर्थिक बदल यासारख्या विषयांवर सखोल संशोधन मांडण्यात आले आहेत.

Leave a Comment