जालना जिल्ह्यासह तालुक्यामध्ये तसेच भारतातील विविध राज्यांत बंजारा समाजाची लोकसंख्या अधिक प्रमाणात आहे.त्यामुळे प्रत्येक समाजाची एक भाषा,एक सण,एक गीत,रिती-रिवाज, चालीरीती असते.त्याच प्रमाणे तसेच बंजारा समाजाचे आहेत.
आज दिपावली सण भारतामध्ये पृत्येक समाज मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने आणी घरोघरी लक्ष्मी पूजन करून साजरी केली जाते.
मुली घरोघरी जाऊन हातात दिवा घेऊन मेरा मागतात.मणतात की, “वर्षे दनेरी कोट दवाळी भैय्या तोंन मेरा”,वर्षे दनेरी कोट दवाळी दिदी तोंन मेरा”,”वर्षे दनेरी कोट दवाळी ममी-पापा तोंन मेरा”,वर्षे दनेरी कोट दवाळी आजी-आजोबा तोंड मेरा”. तसेच दुसर्या दिवसी एकत्र येऊन नदी काठी जाऊन फुल घेऊन येतात.व घरोघरी जाऊन शेणाची पुजा करतात.व विवध पृकारच्या बंजारा बोली भाषेत गीत गायन करतात.
तसेच पत्रकार तुकाराम राठोड यांच्या घरी सावंगी तलाव येथे मुली आले असता,त्यांनी आपल्या कॅमेरा मध्ये या गीत गायनाचे शूटिंग केली आहे.यावेळी मुली गीत गायन करत असतांना काय म्हणतात ते आपण व्हिडिओ च्या माध्यमातून पाहुयात.
अशाप्रकारे बंजारा समाजाची दिवाळी पारंपारिक पद्धतीने व विविध लोकनृत्य व लोकसंगीत गीत-गायन करून,साजरा केली जाते.