हिंगणघाट प्रमोद जुमडे
येथील उपजिल्हा रुग्णालयात बंद असलेले आयसीयू तसेच रुग्णालयातील रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्या व प्रस्तावित मेडिकल कॉलेज हिंगणघाटला देण्यात यावे या मागणीसंदर्भात शासनाला सद्बुद्धी मिळावी म्हणून रुग्णमित्र गजू कुबडे हे दि 19 जूनला येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ एक दिवसाचे सद्बुद्धी आंदोलन करणार आहे.
याबाबत त्यांनी एका निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, हिंगणघाट शहरात आरोग्याच्या असलेल्या अपुऱ्या वैद्यकीय सोयी सवलती मुळे असंख्य गोरगरीब,गरजू रुग्णांना नाईलाजाने वर्धा,सेवाग्राम,सावगी किंवा नागपूर येथे जावे लागत आहे.मागील ७० वर्षांपासून हेच सुरू आहे.
आता सद्यस्थितीत हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात 25 बेडसचे मोडुयलर आय सी यु चे उदघाटन झाले. परंतु उदघाटन झाल्यापासून सदर आयसीयू बंद अवस्थेत पडून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या साठी आवश्यक असलेला स्टॉप या ठिकाणी नाही त्यामुळं सदर केंद्र बंद असल्याचे उपजिल्हा रुग्णालयातून सांगण्यात येत आहे.
या मॉड्युलर आय सी यु साठी एक तज्ञ डॉकटर नसल्याने हे आयसीयू केवळ शोभेची वस्तू ठरलेली आहे.त्यामुळेच या आय. सी. यु. चे उदघाटन झाले त्याच दिवशी तज्ञ डॉक्टरच्या अभावी या रूमला कुलूप लागले ते आजतागायत तसेच आहे.
याची जबाबदारी कोणाची ?
उदघाटन करणाऱ्यांनी या साठी आधी तज्ञ डॉकटरची नियुक्ती केल्यानंतर या केंद्राचे उदघाटन करावयास पाहिजे होते की नाही ? हा त्यांचा सवाल आहे.
सोनोग्राफी मशीन साठी 45 डिग्री तळपत्या उन्हात केलेल्या आंदोलनाचे यश म्हणून गर्भवती महिलांची सोनोग्राफी आठवड्यातून तीन दिवस करण्याचे पत्र मला वैद्यकीय अधिकारी यांनी दिले.व त्यानुसार रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ मीनाक्षी वावरे ह्या आठवड्यातून तीन दिवस गर्भवती महिलांची सोनोग्राफी करीत आहेत व लवकरच सोनोग्राफी तज्ञ डॉकटरची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे मला लेखी कळविले होते.
या आंदोलनाची दखल घेत सहसंचालक आरोग्य सेवा नागपूर यांनी सोनोग्राफी तज्ञ डॉ रेवतकर यांची नियुक्ती केली व तसे पत्र मला आंदोलनाच्याच दिवशी दिले.
आज त्या बातमीला दीड महिन्याचा काळ लोटून राहिला पण डॉ रेवतकर मात्र अजून पर्यंत येथील उपजिल्हा रुग्णालयात रुजू झालेले नाहीत.
या दप्तरदिरंगाई पणा मुळे गोरगरीब जनतेला विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय महाराष्ट्र शासनाने वर्धा जिल्ह्यात मेडिकल कॉलेजची घोषणा केलेली आहे.साकल्याने विचार केल्यास हिंगणघाट मतदार संघात हे मेडिकल कॉलेज होणे गरजेचे आहे.त्यामुळे आपण जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून या बाबत पुढाकार घेऊन शासनाकडे याबाबत पत्रव्यवहार करून सदर कॉलेज या भागात आणावे या विविध मागणी साठी गजू कुबडे स्वतः प्रशासनाला *सद्बुद्धी मिळो हे आंदोलन* करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
येत्या सोमवार दि.१९ जूनला महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ एक दिवसाचे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळात एका छत्रीखाली *सद्बुद्धी आंदोलन* करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निवेदन देते वेळी सुरज कुबडे,अजयभाऊ लढी,मुन्ना ठाकूर,सतीश गलांडे,आकाश तळवेकर,रोशन बरबटकर,मारोतिभाऊ महाकाळकर,सागर आत्राम,रितेश गुडढे, मयूर पुसदेकर