Home Breaking News बकरीला वाचवताना पाण्यात तिघे जनांनी घेतली उड़ी एकाचा मृत्युदेह सापडला

बकरीला वाचवताना पाण्यात तिघे जनांनी घेतली उड़ी एकाचा मृत्युदेह सापडला

498
0

 

मुख्य संपादक
अनिलसिंग चव्हाण

सतत पाऊस सुरु असल्याने नदी नाले ला मोठ्या प्रामानात पुर आलेला आहे नदीकाठाने चरत असलेली बकरी पुराच्या पाण्यात पडल्याने तिला वाचवण्यासाठी प्रवाहात उडी घेतलेले तिघे जण वाहून गेले आहेत. ही घटना खामगाव तालुक्यातील माक्ताकोक्ता गावी सोमवारी (दि. २१) घडली. यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे.

जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. माक्ताकोक्ता येथील गजानन लहानू रणशिंगे (वय ३८), राहूल गजानन रणशिंगे (१६), दिलीप नामदेव कळसकार (४२) हे तिघे बक-या चारण्यासाठी आज बोर्डी नदीपरिसरात गेले होते. दरम्यान त्यांची एक बकरी नदीकाठावरून घसरून प्रवाहात वाहत चालल्याचे पाहून तीला वाचवण्यासाठी राहूल रणशिंगे हा पाण्यात ऊतरला.
परंतु वेगवान प्रवाहात तोही वाहून चालल्याचे पाहून वडील गजानन रणशिंगे व दिलीप कळसकार या दोघांनी नदीत उडी घेतली. परंतु त्यांची धाव अयशस्वी ठरली. तिघेही पुरात वाहून गेल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांना दिलीपचा मृतदेह सापडला असून गजानन व राहूल या पितापुत्रांना शोधण्याचे काम सुरू आहे.

Previous articleसेनगाव शहरातील पशुवैद्यकीय उपकेंद्रात घाणीचे साम्राज्य.
Next article12 लाख 54 हजार बनावट दारू आणि साहित्य जप्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here