बबन राठोड या गरिब शेतकरी मुकडदमाला किडनॅप करून,धमकावून खिशातील पैसे घेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न वारंवार घडत असल्यामुळे या घटनेला कंटाळून त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मदतीची मागणी केली आहेत:

 

प्रतिनिधी:(जालना)दिनांक २१/०९/२०२२ रोजी पोलीस अधीक्षक जालना यांना दिलेल्या निवेदनात बबन राठोड यांनी असे म्हटले आहे की,मी दि.२१/०९/२०२२ या रोजी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान रामनगर कारखाना येथील सोमनाथ जळगाव फाट्यावर मला संतोष काळे,गणेश रंधवे,दादासो करांडे रा.पंढरपूर या तीनही लोकांकडून मला मारहाण केली आहे.खिशातील ४६ हजार रुपये काढून घेतले आहे.यावेळी ते मला म्हणाले की,तु आमच्यासोबत चल व तुझी किडणी विकुन तुझ्याकडील पैसे २,८६०००/-हजार रुपये वसूल करतो.असे म्हणून त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली.व बळजबरीने मला बोलेरो गाडीमध्ये बसवून मारहाण करु लागले.तेंव्हा त्यांनी माझ्या खिशातील ४६ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले.तेंव्हा मी आरडा-ओरडा केल्यानंतर जवळच असलेल्या लोकांनी मला त्यांच्या तावडीतून सुटका केली.तसेच वरील लोकांना व वाहान मालकाला मी आठ ते दहा जोडी कोयते दिले होते.त्या लेबरनी काम करुन पैसे फेडली आहेत.तरी पण या लोकांनी मला तगाता रावने सुरू केला आहे.या अगोदर देखील मला पैशासाठी किडनॅप केले होते.तेव्हा पण मला नातेवाईकांनी त्यांच्या तावडीतून सोडवून आणले होते.तेव्हा मी त्यांच्या विरोधात दिनांक १४/१०/२०२२ रोजी तक्रार अर्ज आपल्या कार्यालयाला दिला होता.सदरील- दादासो करांडे,संभाजी पाटील,सोमनाथ पाटील या लोकांनी माझे चेक वर खोट्या सह्या घेऊन,माझ्या कडे पैसे आहेत म्हणून माझ्या विरोधात माळशिरस येथील पोलीस स्टेशन येथे खोटी तक्रार दिली.त्यामुळे पोलीस अधीक्षक साहेबांनी मला न्याय द्यावा व माझ्या कुटुंबामध्ये मला सुखरूप जीवन जगू द्यावे व अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून मला वाचवावे अशा पद्धतीने मी आपल्याकडे विनंती करीत आहे.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

Leave a Comment