बाजीराव माणिकराव पाटील यांची विरावली विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी निवड

 

यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे

विरावली येथील रहिवासी बाजीराव माणिकराव पाटील यांची विरावली विकास सोसायटीच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली दिनांक 24/07/2023 रोजी निबंध कार्यालयाचे अधिकारी के वी पाटील याच्या अध्यक्षतेखाली चेअरमन पदाची निवडणूक पार पडली

या निवडणुकीत बाजीराव माणिकराव पाटील यांची हजर संचालक मंडळा कडून सर्वानुमते निवड करण्यात आली बाजीराव माणिकराव पाटील भारतीय डाग विभागात पोस्ट विभागात पोस्टमास्तर म्हणून गेले 35 वर्ष विरावली गावात कार्यरत होते

काही दिवसापूर्वी त्यातून निवृत्ती होऊन आपल्या अनुभवाचा आपल्या गावात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून गावात सेवा व्हावी म्हणून शेतकरी परिवर्तन पॅनल च्या वतीने निवडणूक लढवली होती

त्या सर्वाधिक मतांनी निवडून आले होते यांच्या या चेअरमन निवडी बद्दल त्यांचे सहकारी माजी वि का सो चेअरमन अर्जुन पाटील ,संस्थेचे व्हा.चेअरमन नरेंद्र सोनवणे, संचालक युवराज पाटील , लीलाधर कोळी,नावरे येथील रमेश पाटील , संजय मोतीराम पाटील ,गुलाब पाटील, प्रल्हाद पाटील ,कोकिळा पाटील ,उषा महाजन , प्रमिला पाटील आदी संचालक मंडळ यांनी नवनिर्वाचित चेअरमन यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्छा दिल्या.

निवड झाल्या नंतर विरावली गावात फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला या प्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अजय पाटील सर माजी चेअरमन संजय पाटील , पवन पाटील,गिरीष पाटील,धीरज महाजन माजी नगर अध्यक्ष अतुल पाटील माजी नगर अध्यक्ष राकेश कोलते , राष्ट्रवादी चे विधान सभा प्रमुख अनिल साठे , जिल्ह्याउप अध्यक्ष दीपक पाटील , उंटवद वि का चे चेअमन शशिकांत पाटील जिल्ह्यायुवक सरचिटणीस विनोद पाटील ,राष्ट्रवादी समन्वयक किशोर माळी ,युवक कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे , शहर युवक अध्यक्ष हितेश गजरे,दिनकर पाटील संतोष पाटील केदार पाटील,नयन पाटील ,विजय पाटील महेश पाटील,विशाल पाटील युवक तालुका अध्यक्ष देवकांत पाटील , वि का सो चे सचिव प्रमोद सुरवाडे व कर्मचारी सिकंदर तडवी आदींनी शुभेच्छा देत भावी वाटसाचीस हार्दीक शुभेच्छा दिल्या

Leave a Comment