बाबासाहेबांचे विचार आणि भारतीय संविधानच देशाला तारू शकतो–चांगदेव सोरते यांचे प्रतिपादन.

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

आमगाव:-आज दिनांक १४ एप्रिल रोजी विश्वरत्न, महामानव,कायदेपंडित,इतिहासकार,बोधिसत्त्व,महाकारूनीक,ज्ञानाचा महासागर,अर्थतज्ज्ञ,पुस्तकप्रेमी,शोषितांचे उद्धारक, कायदेपंडित,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंतीनिमित्त चामोर्शी तालुक्यातील आमगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मंडळ आमगाव यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भाविका देवतळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव जयश्री खोब्रागडे,सरपंच ज्योत्स्ना गव्हारे,उपसरपंच विनोद शेंगर, सदस्य भाऊराव देवतळे,निर्मला वासेकर,वंदना बैस,वैशाली आदे,डॉ गिरीधर मेश्राम नाचनगाव व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. तर मुख्य मार्गदर्शक विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते हे होते.
दरम्यान मुख्य मार्गदर्शक चांगदेव सोरते यांनी विश्वरत्न महामानव बोधिसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर,कर्तृत्वावर, संघर्षावर,महान त्यागावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.

बोलतांना चांगदेव सोरते म्हणाले की,डाॅ बाबासाहेबांचे आपल्या देशातील प्रत्येक सजीव नागरिकांवर खूप मोठे उपकार आहेत ते फेडणे या जन्मात शक्य पण नाही.बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालले तरी पण प्रत्येकाचे जीवन यशस्वी,समृद्ध,उन्नत आणि सुखी होण्यासाठी शंभर टक्के मदतगार ठरते.

बाबासाहेब हे जगात एकमेव व्यक्तीमत्व आहेत की त्यांना सर्वचजण बाबासाहेब संबोधतात.दोन वर्षे,अकरा महिने आणि अठरा दिवस कठोर परिश्रम करून या देशाला जगातील सर्वोत्तम संविधान दिला आहे,निस्वार्थाचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमानेच येते,आज संविधान बदलविण्यासंदर्भात आपण ऐकतो आहे.परंतू असा साधा विचार करणाऱ्यांना हे सुद्धा माहिती आहे काय?की आकाशाची उंची मोजायला कुठलेही टेप आहे काय? समुद्राच्या पाण्याची पातळी मोजायला कुठलेही मॅप आहे काय?आणि या देशाचे दुसरे संविधान लिहायला यांच्याकडे दुसरा बाप आहे काय?

देश आजही वेगवेगळ्या गुलामगिरीत असल्याचे चित्रण पहायला मिळते आहे,देश चालविणारे हात,विचार आणि समृद्धता परिपक्व असणे गरजेचे आहे….!

प्रसंगी देवळीचे डॉ गिरीधर मेश्राम,भाविका देवतळे व इतर मान्यवर मंडळी यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खोब्रागडे यांनी केले तर आभार राहुल वाळके यांनी यांनी व्यक्त केले.

यशस्वीसाठी संदीप खोब्रागडे व बौद्ध उपासक- उपासिका आणि विशेष सहकार्य केले
प्रसंगी परिसरातील बहुसंख्य बौद्ध उपासक,उपासिका,कार्यकर्ते, गावातील प्रतिष्ठित नागरिक,युवक, महिला,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. DR Babasaheb Ambedkar

Leave a Comment