हिम्मतराव तायडे
महाराष्ट्र ब्युरो चीफ
अकोला जिल्ह्यातील -बाळापुर तालुक्यातील वाडेगाव शेत शिवारात ५२ वर्षीय पुरुषाचा कुजलेला मृतदेह मंगळवारी दुपारी आढळून आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कुंजलेला असल्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात या बाबत संशय व्यक्त केला जात आहे.
व्हिडीओ:-बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील रामराव अवचार यांच्या शेतात किसन दगडुजी ढोके वय ५२ वर्ष यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मंगळवारी आढळून आला या बाबत शेती मालकाने तात्काळ स्थानिक पोलीस चौकीला माहिती दिली यावेळी वाडेगाव पोलीस चौकीचे ए पी आय महादेव पडघम, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक पवार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावंडे, विशाल जावळे, यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. मृतदेहाची दुंर्गधी सुटल्याने ही घटना चार ते पाच दिवसापूर्वी घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून ही आत्महत्या आहे की घातपात हे वैद्यकिय अहवाल प्राप्त झाल्यावर स्पष्ट होईल. यावेळी बाळापुर पोलिस स्टेशनला आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास बाळापुर पोलीस करीत आहेत.
__________________________________