बुलडाणा येथे डॉ.सुनील राजपूत यांच्या श्री सिद्धिविनायक कोविड हेल्थ केअर सेंटर चे उद्घाटन

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ‘स्वाभिमानी’चे नेते मा.रविकांतभाऊ तुपकर यांनी उपस्थित राहून डॉ.सुनील राजपूत यांना शुभेच्छा दिल्या..

:- श्री सिद्धिविनायक कोविड केअर सेंटर हे शहरातील पहिलेच खाजगी कोव्हीड सेंटर आहे. या 200 बेड च्या सुसज्ज हॉस्पिटलचा कोरोनाच्या कठीण काळात जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे..या आधी ज्या कोरोना रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचे असत त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे जावे लागत होते. पंरतु सिद्धीविनायक हॉस्पिटल मुळे बुलडाण्यातच रूग्णांना चांगले उपचार मिळणार आहेत.
यावेळी भाजपा चे नेते मा.आ.विजयराज शिंदे,रा.कॉ.चे नेते मा.नरेश शेळके शंतनू बोंद्रे,पत्रकार रणजित राजपूत, ‘स्वाभिमानी’चे राणा चंदन, नगरसेवक मंदार बाहेकर, डॉ.अनिल साळोख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते..

Leave a Comment