भाजपा पदाधिकार्याचे शासनाविरोधात निषेध व घोषणाबाजी
संग्रामपुर तालुक्यातील बोडखा येथील महादेव आगरकर यांच्या बोडखा शिवारात १५ एककर शेतावर परतीच्या पावसाने बहरलेले सोयाबीन झाडांना शेंगा भरल्याच्या नाही. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची घोर निराशी झाली सोयाबीन उत्पादन खर्च निघत नसून शेतक-यांनी 15 एक्करातील नैराश्य पोटी उभ्या सोयाबीन पिकात ट्रक्टर रोट्याव्हेटर फिरविले सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असुन आर्थिक विळख्यात सापडले. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे गरजेचे अशी मागणी ह्यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे सोयाबीनच्या ७५% शेंगा पोकळ असल्याने तालुका खारपाण पट्ट्यात येत असुन सोयाबीन उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांना लावलेला खर्च निघत नसल्याचे वस्तुस्थिती असल्याने काळजावर दगळ ठेवुन नैराश्य पोटी ट्रक्टर रोट्याव्हेटर फिरविले. ह्यावेळी भाजपा संग्रामपूर तालुकाध्यक्ष लोकेश राठी यांच्या नेतृत्वात प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्याला धीर देत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आले . ह्यावेळी तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते शेतात उपस्थित होते..