भर पावसात जनता हजारोच्या संख्येने उतरली रस्त्यावर….

 

कर वाढीच्या निषेधार्थ अतुल वांदिलेच्या नेतृत्व पालिकेवर धडकला सर्व पक्षीय जनआक्रोष मोर्चा …..

सिंदी रेल्वे (ता. २१) :नगर पालिकेने वाढविलेल्या अव्वाढव्य
मालमत्ता कर (घर टॅक्स) वाढीच्या निषेधार्थ सामान्य सिंदीकरांनी एकत्र येत राकाचे अतुल वांदिलेच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता.२१)ला दुपारी ११ वाजता सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा पालिकेवर धडकला.
सविस्तर वृत्त असे की, सिंदी (रेल्वे) येथे नगर पालिका प्रशासनाने करामध्ये ३५% ते ४०% नी वाढ केलेली आहे.

ती अवाढव्य वाढ कमी करण्याकरीता पालिकेचे मुख्याधिकारी आश्रमे यांना शहरातील जनतेच्या वतीने घरटैक्स कमी करण्याबाबत ३० जुन ला निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यावर मुख्याधिकारी साहेबांनी कोणताही तोडगा काढला नाही.

त्यानंतर परत १२ जुलै ला प्रभारी मुख्याधिकारी विजय आश्रमा यांना मोर्चेकरांनी घेराव घालीत मागणीसाठी आंदोलन केले. तरी सुद्धा न.पा.प्रशासनाने कोणत्याही प्रकारे कार्यवाही केली नाही व समाधानकारक उत्तर सुद्धा दिले नाही.

वारंवार निवेदन देवून सुद्धा पालिका प्रशासन कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे सामान्य गोरगरीब सिंदीवासीयांच्या मनात पालिका प्रशासनाच्या विरोधात आक्रोश निर्माण झाला होता.

यांचा उद्रेक म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात सिंदी शहरातील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील सर्व सामान्य नागरीकानी शुक्रवारी (ता.२१) ला बाजारपेठेतील गांधी चौकातुन करवाढी विरुद्ध जनआक्रोश मोर्चा काढला.

सकाळ पासुन शहरात जोरदार पाऊसाच्या सरीवर सरी कोसळत असतांनी सुध्दा हजारोच्या संख्येने सिंदीकर मोर्चात सहभागी झाले होते. पालिका प्रशासना विरुद्ध घोषणा देत मुख्य रस्त्याने जात मोर्चा पालिका कार्यालयावर धडकला येथे वांदिले यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय शिष्टमंडळानी मुख्याधिकारी आश्रमे यांच्या सोबत चर्चा केली. मात्र कोणतेही समाधान व्होवु शकले नसल्याने रोष व्यक्त करुन मोर्चेकर रित्या हाताने परतले.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले आणि राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह सिदी रेल्वे शहरातील काग्रेसचे, शिवसेनेचे(उध्दव ठाकरे) , भाजपाचे, वंचित बहुजन आघाडीचे, आरपीआयचे आदी सर्व पक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते…

“जनतेचा जनआक्रोश मान्य असुन शहरातील वाढविलेल्या मालमत्ता करा बाबत मा. जिल्हाधिकारी साहेबांना पत्रव्यवहार करुन अवगत करतो आणि शासन नियमाच्या आधीन राहून मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या सूचनेनुसार काय मार्ग निघतो ते आपण येत्या १५ आॅगस्ट पर्यंत मोर्चेकरांना कळवू. ”
विजयकुमार आश्रमा
प्रभारी मुख्याधिकारी
नगर परिषद सिंदी रेल्वे

” येत्या १५ आॅगस्ट पर्यंत प्रशासनाने यावर तोडगा काढवाॎ अन्यथा उग्र आणि आक्रमक आदोलन करु. हजारोच्या संख्येने चक्का जाम आदोलन करू यामुळे होणार्‍या परिस्थितीला प्रशासन स्वतः जबाबदार राहील”
अतुल वांदिले
प्रदेश सरचिटणीस
राष्ट्रवादी (शरद पवार)

Leave a Comment