भाजपच्या जिल्हा चिटणीस पदी स्नेहल कलोडे.

 

सिंदी रेल्वे. – भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा चिटणीस पदी स्नेहल दत्ताजी कलोडे यांची नियुक्ती करण्यात आली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट यांनी नुकतीच पक्षाच्या कार्यकारिणीची घोषणा केली. यात सिंदी रेल्वे मधून जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, खासदार रामदास तडस, आमदार समिर कुणावार, रामदास आंबटकर, उपेंद्र कोठेकर यांनी केलेल्या शिफारसीनुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली.

नियुक्ती बद्दल स्थानीक भाजपा चे पदाधिकारी, शक्तीप्रमुख, बुथप्रमुख व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले…

Leave a Comment