भाजपा भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जालना जिल्हा शहर व ग्रामीण प्रभारी श्रीरामजी मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन:

 

Jalna प्रतिनिधी:(जालना)भाजपा भटके विमुक्त आघाडी चे राज्यव्यापी अधिवेशन २२ डिसेबंर रोजी नागपूर येथे घेण्यात येणार आहे.त्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाची पूर्व तयारी म्हणून संघटनात्मक बांधणीसाठी महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी चे सचिव तथा जालना जिल्हा शहर व ग्रामीण चे प्रभारी श्रीरामजी मुंढे हे आज दिनांक ३० नोव्हेबंर रोजी जालना जिल्हा भारतीय जनता पार्टी कार्यालय संभाजीनगर जालना दौऱ्यावर आले होते.त्यांनी सांगितले की,नागपूर येथील भटके विमुक्त आघाडीचे अधिवेशनासाठी जास्तीत-जास्त पदाधिकाऱ्यांनी यावेत व राहिलेल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करावी व अहवाल लवकरात-लवकर पाठवावेत अशा प्रकारची मागणी त्यांनी भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश तारगे यांना सांगितले आहे.तसेच जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी,युवा जिल्हा पदाधिकारी,तालुकाध्यक्ष,महिला आघाडीच्या पदाधिकार्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन मुंढे यांनी केले आहे.यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉ.रमेश तारगे,उद्धव जायभाये,दिलीप जाधवर,सुहास मुंढे,वसंत शिंदे,तुकाराम राठोड,रामनाथ राठोड,शिवाजी राठोड,राजू राठोड,लक्ष्मण राठोड तसेच शहरातील दिलीप जाधव आणि वडार समाज बांधव व त्यांचे सहकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jalna

Leave a Comment