भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम फाउंडेशन चा उपक्रम स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाचे विद्यार्थी रोवणार जागतिक स्तरावर झेंडा…

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद प्रतिनिधी:-

दि.२४ रामेश्वरम येथील भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम फाउंडेशन च्या सौजन्याने येत्या ७ फेब्रुवारी रोजी अत्यंत कमी वजनाचे शंभर उपग्रह अवकाशात झेपावणाऱ असून यातील दोन उपग्रह हे स्थानिक स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केले आहेत. देशातील एकूण एक हजार विद्यार्थ्यांचा “स्पेस रिसर्च २०२१” या वैज्ञानिक उपक्रमात सहभाग असून ह्या उपक्रमाची जागतिक पातळीवर नोंद होणार असल्याने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ चे विद्यार्थी जागतिक स्तरावर आपला झेंडा रोवणार असून विविध प्रकारचे पाच उपक्रमांमध्ये त्यांच्या नोंदी होणार आहेत. ह्या प्रकल्पाविषयी माहिती देण्यासाठी दिनांक २४ डिसेंबर रोजी स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख संयोजक मिलिंद चौधरी यांनी उपस्थितांशी ऑनलाइन चर्चा केली. यावेळी संस्थाध्यक्ष ऍड.गिरीश माळपांडे, संचालक नंदकिशोर काथोटे,प्राचार्य, विद्यार्थी व पालकांची तसेच संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.संस्थेचे अध्यक्ष ऍड. गिरीश माळपांडे आणि या प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक मिलिंद चौधरी यांच्या समन्वयातून स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाचे दहा विद्यार्थ्यांच्या एका गटाची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेली आहे. ह्या प्रकल्पात दहा विद्यार्थ्यांचा एक गट असून हे बालवैज्ञानिक २५ ते ८० ग्रॅम वजनाच्या लहानात लहान असे शंभर उपग्रह तयार करणार आहेत. इतर शाळांमधील विद्यार्थी हे एक उपग्रह तयार करीत असून स्वामी विवेकानंद शाळेमधील विद्यार्थ्यांना दोन उपग्रह तयार करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यांनी बी.एम.पी.आणि डी. टी.एच.-11 असे दोन उपग्रह तयार केले असून बी एम पी हा उंची ,हवेचा दाब याविषयीचा अभ्यास करेल तर दुसरा डी.एच.टी.-11 हा हवेतील आद्रता विषयीचा अभ्यास करेल. हे सर्व उपग्रह एका किटमध्ये फिट करून सात फेब्रुवारी रोजी हे शंभर उपग्रह सकाळी १०.३० वाजता रामेश्वरम येथील केंद्रांमधून मधून अवकाशात झेपावणाऱ आहेत.ह्या किट सोबत पॅरॅशूट(लाइट हेलिएम बलून), जी.पी.एस. ट्रॅकिंग सिस्टम सह लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल. सुमारे दहा किमी अंतर गेल्यानंतर या उपग्रहाचा केंद्राशी संपर्क तुटेल नंतर परत पंचवीस किलोमीटर पर्यंत ओझोन कक्षा पार करत पस्तीस किलोमीटर पर्यंत हे उपग्रह पोहोचणार असून नंतर परत पृथ्वीच्या दिशेने झेपावणार असून रामेश्वरम लगतच्या १२७ किलोमीटर परिसरात ते खाली कोसळतील.अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख मिलिंद चौधरी यांनी दि.२४डिसेंबर रोजी ऑनलाईन चर्चेदरम्यान दिली.

——————————————————

“प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दिसतो.”– ऍड गिरीश माळपांडे

भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कुटुंबीयांनी सुरू केलेल्या या उपक्रमासाठी या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक मिलिंद चौधरी यांच्या सोबत संपर्क करून स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ मधील विज्ञानाविषयी प्रगती, रुची आणि अभिरुची असलेल्या दहा विद्यार्थ्यांचे एका गटाची त्यांनी निवड केली.इंजिनिअर, डॉक्टर होणे फार चांगली गोष्ट आहे ,पण त्याहून अधिक चांगली बाब म्हणजे शास्त्रज्ञ होणे. मला माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दिसतो असे मत ह्यावेळी संस्थेचे अध्यक्षऍड.गिरीश माळपांडे यांनी व्यक्त केले. येत्या ७ फेब्रुवारीला हे उपग्रह अवकाशात झेपावणाऱ असून ह्या सर्व कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण विद्यार्थ्यांना त्यांचे मोबाईलवर दिसणार आहेच परंतु मोठ्या स्क्रीन व ते प्रक्षेपण शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांना व इतरांना दाखविण्याची व्यवस्था केली असल्याचेही यावेळी ऍड. माळपांडे यांनी सांगितले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांना ह्या प्रोजेक्ट मध्ये सहभाग नोंदवून शाळेवर विश्वास टाकला त्याबद्दल त्यांनी पालकांचे आभार पण मानले. आपल्या शाळेमधून निवड झालेल्या दहा विद्यार्थ्यांच्या गटाचा प्रमुख कोण विद्यार्थी आहे? असे विचारले असता ऍड.माळपांडे यांनी सांगितले की प्रत्येक विद्यार्थी हा या गटाचा प्रमुख आहे. आणि त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर सर्व उपस्थितांना त्याचा प्रत्यय व अनुभव देखील आला.

——————————————————-

रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ प्रकल्पात सहभागी विद्यार्थी :–

१)प्रणित विलास हागे २) देवयानी रवींद्र इंगळे ३) राज रामेश्वर पारस्कर ४)भूषण संतोष देशमाने ५)सृष्टी रवींद्र गावंडे ६)प्रांजल वासुदेव दुकाने ७)तेजस्विनी मधुकर ताठे ८)ओम सोनाजी हागे ९)वेदांत अरविंद आगरकर १०)आर्या दिलीप राठी

——————————————————

हे सर्व शंभर उपग्रह एकाच वेळी अवकाशात प्रक्षेपित केले जाणार असून हा एक जागतिक आशिया खंडातील आणि भारतीय स्तरावरचा विक्रम ठरणार असल्याने या उपक्रमाची ग्रीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद होणार आहे. या प्रकल्पातील सहभागी विद्यार्थ्यांच्या समूहाला कलाम कुटुंबीयांतर्फे सन्मानपत्र दिले जाईल, शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यांना देखील व्यक्तिगत

Leave a Comment