माननीय उपविभागीय अधिकारी हिंगणघाट. यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपतीजी भारत सरकार दिल्ली, यांना भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी हिंगणघाट व समुद्रपूर तालुका, जिल्हा वर्धा यांच्यातर्फे आज दि. 27/6/22 ला निवेदन देण्यात आले. देशात कार्यरत असलेल्या भाजपा प्रणीत केंद्र सरकारने अलीकडील काळात देशाच्या अतिमहत्त्वाच्या अशा संरक्षण क्षेत्रात अग्नीपथ नावाने योजना आणली आहे. ज्यामुळे देशाच्या सर्वांगीण तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही योजना योग्य नाही तसेच देशातील तरुणांच्या भविष्यासाठी सुद्धा अयोग्य आहे. असे काँग्रेसचे नागरिकांच्या वतीने मत आहे. भारताची एकूणच समाज रचना लोकशाही ह्या गोष्टी जगातील इतर देशांपेक्षा वेगळ्या आहे त्यामुळे इजराइल किंवा इतर देशातील नीती या ठिकाणी संयुक्तिक होत नाही. हाच आमचा इतिहास, वर्तमान व भविष्य आहे. ही योजना राबवित असताना ना संसदेत चर्चा,ना जनतेशी चर्चा,ना सेनेशी चर्चा अशा पद्धतीने लोकशाही संस्था वर हुकूमशाही प्रमाणे भूमिका थोपवणे याचा आम्ही सर्वार्थाने निषेध करतो. व तात्काळ हे योजना रद्द करण्यात यावी. व देशातील तरुणांना, सेनेला व जनतेला दिलासा द्यावा अन्यथा याचे गंभीर परिणाम देशासमोर येईल. असा इशारा काँग्रेस पार्टी हिंगणघाट तर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला.या निवेदन देताना माजी उद्योगमंत्री अशोक शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष पंढरीभाऊ कापसे, अमित चाफले, नकुल भाईमारे, सुरेश गायकवाड, अखिल धाबरडे, प्रशांत राऊत, नरेंद्र चाफले, विनोद हिवंज, सुधा शिंदे, करूना वाडकर, प्रमिला हीवंज, लता गलांडे, अनिता गौतम, प्रमिला झिंगरे, ई.मोठ्या संख्येने उपस्थित होते.–हिंगणघाट नईम मलक