भारत मुक्ती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा,छत्रपती क्रांती सेना,राष्ट्रीय पिछडा (ओबीसी) वर्ग मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ, मौर्य क्रांती संघ, लहुजी क्रांती मोर्चा यांच्या द्वारे 2 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले होते.
यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुजित बांगर यांच्या नेतृत्वामध्ये संग्रामपूर तालुक्यातील मध्यभागी असलेल्या वरवट बकाल येथे विविध मागण्यांसाठी सकाळी ७ वाजतापासून दुपारी १२ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला.
१) गृहमंत्री फडणवीस यांच्या आदेशावरून मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ला व गोळीबाराच्या विरोधात.
२) महाराष्ट्र राज्यात 62 हजार सरकारी शाळांचे खाजगीकरणाच्या संविधानविरोधी व बहुजनविरोधी आरएसएस/भाजप सरकारच्या धोरणाच्या विरोधात.
३) शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र वेठबिगारांचा महाराष्ट्र करणाऱ्या आरएसएस/भाजप सरकारच्या धोरणा विरोधात.
४) ओबीसींची जात निहाय जनगणना करणे व संविधानिक हक्क अधिकाऱ्यांच्या समर्थनात.
५) बहुजनांचे प्रेरणास्थळ पंढरपूरचे पांडुरंगाचे मंदिर बडवे ब्राह्मणाच्या स्वाधीन करणाऱ्या आरएसएस/भाजपच्या षडयंत्राच्या विरोधात.
६) बहुजन महापुरुषांचा,संविधान व राष्ट्रप्रतीकांचा अपमान करणाऱ्या देशद्रोही आतंकवादी दंगलखोर मनोहर भिडेला अभय देणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बंद चे आव्हान वरील सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले होते.
ह्याच मुद्द्यांना समर्थन म्हणून संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल या ठिकाणी महाराष्ट्र बंद आंदोलनामध्ये बहुजन समाजातील विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे त्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनोद पवार, सिद्धार्थ तायडे, दयावंत इंगळे तसेच भारतीय बेरोजगार मोर्चाचे जिल्हा महासचिव जगदीश कोकाटे,राहुल नितोने,रवि नितोने,पंकज वानखडे,महेंद्र इंगळे, असंघटित कामगार संघाचे जिल्हा अध्यक्ष करुणानंद तायडे, सचिन कोकाटे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका अध्यक्ष मिलिंद भटकर प्रदीप निंबाळकर नाना तायडे संजय सोनवणे,संतोष भारसाकडे व भारत मुक्ती मोर्चाचे
कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने बंद आंदोलनामध्ये सहभागी होते यावेळी महाराष्ट्र बंद हे आंदोलन यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी स्थानिक व्यावसायिकांनी दुकानदारांनी आपली आस्थापने कडकडीत बंद ठेवून सहकार्य केले व पोलीस प्रशासनाने कडकडीत बंदोबस्त तैनात करून आंदोलकांना सहकार्य केले त्याबद्दल या सर्वांचे आभार मानण्यात आले.