भालोद येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक पार्श्वभुमीवर आयोजित बैठकी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपा प्रवेश

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

पुढील महीन्यात होवु घातलेल्या आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुक पार्श्वभुमीवर भालोद तालुका यावल येथे संपन्न झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता रणनिती आखण्यासाठीच्या मेळाव्यात परिसरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षात केला जाहीर प्रवेश.

भालोद तालुका यावल येथे माजी खासदार स्व . हरिभाऊ जावळे यांच्या संपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा आमदार सुरेश (राजुमामा ) भोळे यांच्या अध्यक्षतेखाली यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढील महीन्यात होवु घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकी संदर्भातील रणनिती आखण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ,

या बैठकीत अंजाळे तालुका यावल ग्रामपंचायतचे उपसरपंच व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन दिपक नरोत्तम चौधरी तसेच सोसायटीचे सदस्य शुभमपंडीत चौधरी या कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे , तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे ,भाजपाचे युवा नेतृत्व अमोल हरिभाऊ जावळे, कृउबाचे माजी सभापती हिरालाल चौधरी , कृउबाचे माजी सभापती नारायण चौधरी, जिल्हा परिषदच्या सदस्या सविता अतुल भालेराव , डॉ कुंदन फेगडे, पांडुरंग सराफ , जिल्हा बँकेचे संचालक नितिन चौधरी , सौ कांचन फालक पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवी चौधरी , सरपंच परिषदचे जिल्हा अध्यक्ष पुरुजित चौधरी, डॉ नरेन्द्र कोल्हे , कृउबाचे माजी उपसभापती राकेश वसंत फेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रविन्द्र सुर्यभान पाटील, नरेन्द्र नारखेडे , पंचायत समितीचे माजी उपसभापती योगेश भंगाळे,भरत महाजन , पक्षाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी व उज्जैनसिंग राजपुत, हर्षल पाटील आदी पक्षातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते .

यावेळी येणाऱ्या कृउबा निवडणुकीत भाजपाचे पारडे जड असुन , एक संध राहुन निवडणुक लढवुन मागील पंधरा वर्षापासुन पक्षाच्या ताब्यात असलेली बाजार समिती पुनश्च बहुमताने सत्ता आपल्या ताब्यात येणार असल्याचा आत्मविश्वास उपास्थितांनी व्यक्त केला .बैठकीचे प्रस्ताविक नारायण चौधरी यांनी केले तर सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार पक्षाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी यांनी मानले.

Leave a Comment